शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

समाविष्ट गावांचे नियोजन अधांतरीच, पुढील आर्थिक वर्षात होणार नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 06:42 IST

समाविष्ट गावांबाबत महापालिकेचे काहीच नियोजन नसल्याचे बुधवारच्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट झाले. या गावांसंबधीचा विषय चर्चेला आल्यानंतर शहर अभियंता प्रशांत वाघमारे सभेला उपस्थित नसल्याबद्दल महापौर मुक्ता टिळक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

पुणे : समाविष्ट गावांबाबत महापालिकेचे काहीच नियोजन नसल्याचे बुधवारच्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट झाले. या गावांसंबधीचा विषय चर्चेला आल्यानंतर शहर अभियंता प्रशांत वाघमारे सभेला उपस्थित नसल्याबद्दल महापौर मुक्ता टिळक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, असे त्यांनी सांगितले.समाविष्ट गावांमधील विकास आराखडा व त्यासंबंधीचे दोन विषय बुधवारच्या सर्वसाधारण सभेत होते. शहर अभियंत्यांशी संबंधित हे विषय आहेत. मात्र, सभेला शहर अभियंताच उपस्थित नव्हते. आयुक्त कुणाल कुमार हेही परगावी असल्यामुळे सभेत नव्हते. महापौरांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. समाविष्ट गावांसंबधीचे विषय सभेत आहेत, याची माहिती असतानाही ही अनास्था दाखवली याबद्दल त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सभेला उपस्थित दोन्ही अतिरिक्त आयुक्तांनी या नाराजीची दखल घ्यावी, असे त्या म्हणाल्या.दरम्यान, राजाभाऊ लायगुडे यांनी या गावांमधील विसर्जित ग्रामपंचायतींमधून महापालिकेत वर्ग झालेल्या कर्मचाºयांना ४ महिने वेतन मिळालेले नाही. त्यांचे हाल सुरू आहेत, याची जबाबदारी कोण घेणार? अशी विचारणा प्रशासनाकडे केली. त्यांच्यापैकी काहींच्या घरात आजारी व्यक्ती आहेत. त्यांच्या औषधोपचारालाही त्यांच्याजवळ पैसे उरलेले नाहीत. नगरसेवक म्हणून ते आमच्याकडे येऊन आमचे काय झाले, अशी विचारणा करतात, त्यांना काय उत्तर द्यायचे, असे ते म्हणाले.नगरसेवक सचिन दोडके, युवराज बेलदरे यांनीही हाच प्रश्न प्रशासनानाला विचारला. गावांमध्ये सार्वजनिक आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. साधी कचरा उचलण्याची सुविधाही या ग्रामस्थांना मिळत नाही. त्याचप्रमाणे रस्ते चांगले नाहीत, त्याकडे प्रशासन पूर्ण दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप दोडके व बेलदरे यांनी केला. आणखी काही नगरसेवकांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले.अतिरिक्त आयुक्त शीतल तेली-उगले यांनी या गावांमध्ये तातडीच्या अशा सर्व सेवा दिल्या जात असल्याचे सांगितले. प्रशासन त्याबाबत दक्ष आहे. गावांमधील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांची बैठक घेतली होती, तीमध्ये त्यांच्या मागण्यांची माहिती घेतली. आरोग्य किंवा अन्य आवश्यक गोष्टींकडे प्रशासन पूर्ण लक्ष देत आहे, असा दावा त्यांनी केला. रस्ते तसेच भांडवली खर्चाच्या कामांबाबत पुढील आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात तरतूद केली जाईल, असे त्या म्हणाल्या. निधी वर्गीकरणाचे प्रयत्न आयुक्त स्तरावर होत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका