शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेले सिंचन प्रकल्प लागणार मार्गी

By admin | Updated: December 20, 2014 00:02 IST

भोर, वेल्हे तालुक्यातील नीरा-देवघर व गुंजवणी-चापेट प्रकल्पांतर्गत रखडलेले कालवे, उपसा जलसिंचन योजना तसेच प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन तातडीने करा

भोर : भोर, वेल्हे तालुक्यातील नीरा-देवघर व गुंजवणी-चापेट प्रकल्पांतर्गत रखडलेले कालवे, उपसा जलसिंचन योजना तसेच प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन तातडीने करा, असे आदेश जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी गुरुवारी दिले. नागपूर येथे आमदार संग्राम थोपटे तसेच प्रकल्पग्रस्त व अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत वरील आदेश देण्यात आले. भोर, वेल्हे तालुक्यातील धरणांचे कालवे, उपसा योजना व पुनर्वसनाच्या रखडलेल्या कामांसंदर्भात बैठक घ्यावी, अशी मागणी थोपटे यांनी केली होती. त्यानुसार गुरुवारी सकाळी सकाळी शिवतारे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. बैठकीला थोपटे यांच्यासह जलसंपदा विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता शहा, अधीक्षक अभियंता चौधरी, कार्यकारी अभियंता पी. ए.पवार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी तुषार ठोंबरे, भोरचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार राम चोबे, भाटघर प्रकल्पग्रस्त संघटनेचे सरचिटणीस आनंद सणस, खेरदी-विक्री संघाचे अध्यक्ष हनुमंत शिरवले, संदीप नगिणे, गणपत देवगिरीकर आदी उपस्थित होते. बैठकीत गुंजवणी- चापेट प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना स्लॅबपात्र धारकांची यादी करून धानेप, वेल्हे बु., कोदापूर व भोसलेवाडी येथील जागेचे भूखंड तातडीने वाटप करावे, कि.मी. ० ते ८६ पर्यंत मौजे राख (पुरंदर) या गावापर्यंत बंद पाइपलाइनद्वारे कालव्याचे कामाचे व मौजे दिवळे (भोर) येथून मौजे नारायणपूर (पुरंदर) येथे उपसा जलसिंचन योजनेचे तातडीने सर्वेक्षण करून अंतिम अहवाल सादर करावा, गुंंजवणी-चापेट धरणातील तिराचे (बाह्यवळण) सुमारे ४ कि.मी. अंतराच्या रस्त्याचे अंदाजपत्रक तातडीने बांधकाम विभागाकडे हस्तांतर करावे, वेनवडी उपसा जलसिंचन योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुसऱ्या टप्प्याच्या निविदा काढाव्या, असे आदेश या वेळी देण्यात आले. या सर्व विषयांचा फेरआढावा घेण्यासाठी १३ जानेवारीला मुंबईत बैठक घेण्यात येणार असल्याचेही या वेळी ठरले. दरम्यान, शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे, माजी जि.प. सदस्य रमेश कोंडे, माजी उपसभापती अमोल पांगारे व इतर पदाधिकाऱ्यांनी शिवतारे यांची नागपूर येथे भेट घेऊन नीरा-देवघर व गुंजवणी धरणातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन देऊन कामे मार्गी लावण्याची मागणी केली. (वार्ताहर)