शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

योजना कागदावर, मीटर त्वरित

By admin | Updated: May 20, 2017 05:28 IST

चोवीस तास पाणी योजनेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी पैसे मोजावे लागणार, हे आहे. त्यासाठीच्या पाणी साठवण टाक्या, नव्या जलवाहिन्या असे

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : चोवीस तास पाणी योजनेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी पैसे मोजावे लागणार, हे आहे. त्यासाठीच्या पाणी साठवण टाक्या, नव्या जलवाहिन्या असे सर्व काही अद्याप कागदावरच असताना या योजनेतंर्गत तब्बल ६०४ कोटी रुपयांची मीटरखरेदीची निविदा प्रसिद्धही करण्यात आली असून, त्यातही विशिष्ट कंपनीलाच हे काम मिळावे, यासाठी प्रयत्न केले गेले असल्याचे बोलले जाते.योजनेला पाठिंबा देणाऱ्या तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनेच टाक्यांच्या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून झालेल्या वादामुळे अचानक मीटरच्या कामाला हरकत घेतली. काँग्रेसनेही त्यांच्या सुरात सूर मिसळला. प्रथम पाईपलाईन, टाक्या व त्यानंतरच मीटर अशी भूमिका घेतली गेली; त्यामुळे आता निविदा प्रसिद्ध होऊन त्याला प्रतिसाद मिळाला असला तरी प्राप्त निविदा अद्याप खुल्या करण्यात आलेल्या नाहीत. फक्त दोनच निविदा प्राप्त झाल्या असून त्यात महापालिका आयुक्त कुणाल कुमार आग्रही असलेल्या ‘त्या’ कंपनीची निविदाही असल्याची माहिती मिळाली. निविदा प्राप्त होऊन आता ७ महिने झाले आहेत. तरीही प्रशासनात या विषयावर गुप्तता पाळण्यात येत आहे. त्यामुळे या योजनेतील जलवाहिन्यांच्या, पाणी साठवण टाक्यांच्या कामानंतर आता हे कामही वादात सापडले आहे. त्यामुळे कुणाल कुमार यांच्याबाबतच संशय निर्माण झाला आहे. एकूण ३ लाख १५ हजार मीटर यात बसवण्यात येणार आहेत, असे सांगण्यात येते. या मीटरबाबत खुद्द महापालिकेतही पदाधिकाऱ्यांना कसलीच माहिती नाही. त्यामुळेच ही ३ लाख १५ हजार संख्या कशावरून काढण्यात आली, असा सवाल काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, माजी उपमहापौर आबा बागुल तसेच काही स्वयंसेवी संस्था-संघटनाांनी केला आहे. शहरात नळजोडांची अधिकृत संख्या साधारण दीड लाख असून तेवढेच; किंबहुना त्यापेक्षा जास्त अनधिकृत नळजोड आहेत. प्रशासनाकडूनच ही माहिती देण्यात येत असते. समान पाणी योजनेत बसवण्यात येणाऱ्या मीटरमुळे हे सर्व अनधिकृत नळजोड सापडतील व ते अधिकृत होतील, असे समर्थन करण्यात येत आहे. नवी मीटर अत्याधुनिक असून त्यांना सेन्सर बसवण्यात आले आहे. पाणी सोडले, की लगेचच ते मोजले जाईल. एखाद्या विभागातून जाताना विशिष्ट यंत्रावर या सेन्सरमधून संदेश दिले जातील व त्यावरून कोणत्या भागात किती पाणी दिले गेले व त्यापैकी किती पाण्याचा कोणाकडून वापर झाला ते या मीटरवरून अचूक समजण्यात येणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.बिल भरणार कोण? : प्रबोधन नाहीयोजनेची चर्चा सुरू असतानाच प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी हे मीटर बसवावेत म्हणून प्रबोधन मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र , हे मीटर कसे बसवणार, मोठ्या सोसायट्यांमध्ये ते सोसायटीला बसवणार की प्रत्येक सदनिकेत बसवणार, झोपडपट्टीमधील रहिवाशांसाठी काय करणार, जुन्या वाड्यांमध्ये असलेल्या जुन्या नळजोडांना ते बसवले तर मग पाण्याचे बिल कोण भरणार, अशा बऱ्याच प्रश्नांवर मात्र प्रशासनाने काहीच प्रबोधन केले नाही.मीटर बसविण्याचा प्रयोग अयशस्वीप्रशासनाच्या या प्रबोधन मोहिमेतूनच नळजोडांना मीटर बसवण्यासाठी घाई केली जात आहे, हे उघड झाले. महापालिकेने आताही व्यावसायिक व औद्योगिक वापरासाठीच्या नळजोडांना मीटर बसवले आहेत. असे एकूण ४० हजार मीटर असून त्यांतील २० ते २५ हजार बंदच आहेत. घरगुती नळजोडांना मीटर बसवण्याचा प्रयोग याआधीही काही वर्षांपूर्वी प्रशासनाने केला होता; मात्र तो अयशस्वी झाला होता. आता पुन्हा एकदा सर्व नळजोडांना या योजनेअंतर्गत मीटर बसवण्यात येणार आहे. मात्र, बसवण्याआधीच ते वादग्रस्त झाले आहेत.