शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

जागा १५; उमेदवार ९३

By admin | Updated: February 19, 2015 23:33 IST

एक हजार कोटींच्या ठेवी असणाऱ्या बारामती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मैदानात तब्बल ९३ उमेदवार उतरले आहेत.

सोमेश्वरनगर : एक हजार कोटींच्या ठेवी असणाऱ्या बारामती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मैदानात तब्बल ९३ उमेदवार उतरले आहेत. जिल्हा बँकेप्रमाणे आता या बँकेलाही इच्छुक वाढले आहेत. संचालकपदासाठी ग्रामीण भागातील सभासदांनीही आपली ताकद पणाला लावली आहे.बारामती बँकेच्या एकूण ११ हजार ५९९ मतदारांपैकी बारामती व जळोची शाखेतून ५ हजार ३८८ मतदार आहेत. इतर ६ हजार २११ मतदार बारामती शहराबाहेरील आहेत. बाहेरील मतदारांपैकी इंदापूर शाखेला ८९० मतदार, दौंड शाखेला ६७८ मतदार, भिगवण शाखेला ६०० मतदार तर नीरा शाखेला ४६७ मतदार, मार्केट यार्डला ७६० तर पिंपरी चिंचवड शाखेला ६७२ मतदार आहेत. सातारा, सोलापूर, नगर जिल्ह्यांतील शाखांमध्येही दोनशे ते चारशेंच्या आसपास मतदार आहेत. या वेळी बँकेवर पंधरा जणांचे संचालक मंडळ असणार आहे. दहा जण खुल्या गटातून, दोन महिला, एक ओबीसी, एक एसटी किंवा एससी, एक एनटी अशी वर्गवारी असेल. शिवाय दोन स्वीकृत संचालक घेतले जाणार आहेत. या वेळी शहराबाहेरून चार-पाच जणांना संधी दिली जाईल तर शहरातून दहा-बारा जणांना निवडले जाईल, असा अंदाज आहे. या वेळी अर्जांच्या छाननीनंतर ९३ जणांचे १३४ अर्ज शिल्लक आहेत. ९३ जणांपैकी दहा जण शहराबाहेरील शाखांकडून इच्छुक उमेदवार म्हणून पात्र ठरले आहेत. यामध्ये सातारा शाखेकडून विकास नलवडे हे एकमेव इच्छुक आहेत. दौंड व मार्केट यार्डमध्ये सभासदसंख्या चांगली असूनही अर्ज दाखल नाहीत. इंदापूरमध्ये इंदापूर व भिगवण या दोन शाखा आहेत. मात्र विद्यमान संचालक सुनीता कोरटकर पुन्हा इच्छुक आहेत. याशिवाय सर्जेराव काळे, आनंद देशपांडे, अशोक घोगरे असे आणखी तिघे जण इच्छुक आहेत. बारामती तालुक्यातील पणदरे येथील नारायण कोकरे, अलंकार जगताप, दिलीप जगताप यांच्यासह विद्यमान संचालक विलास जगताप पुन्हा इच्छुक आहेत. तर पुरंदर तालुक्यातील नीरा शाखेकडून बारामतीच्या पश्चिम भागातील राज्य सराफ महामंडळाचे उपाध्यक्ष किरण आळंदीकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. नीरा शाखेशी बारामतीचा पश्चिम भाग, पुरंदर, खंडाळा व फलटण हे तालुके जोडले गेल्याने स्वतंत्र संचालक मिळावा अशी अपेक्षा सभासदांनीही व्यक्त केली आहे. शाखा स्थापनेपासून या शाखेला आपला संचालक मिळालेला नाही. (प्रतिनिधी)४मागील संचालक मंडळामध्ये इंदापूरमधून सुनीता कोरटकर व बारामती ग्रामीणमधून विलास जगताप यांना संधी मिळाली होती. या वेळी पक्ष त्याच चेहऱ्यांना निवडतो की नवीन चेहऱ्यांना संधी देतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ४मागील काळात राष्ट्रवादीची पीछेहाट झाल्यानंतर पक्षातील ज्येष्ठांनी आगामी निवडणुकीत नवे व निष्ठावान चेहरे देणार असल्याचे सूतोवाच केले होते. यामुळे ग्रामीण भागातही बँकेच्या संचालकपदाची संधी मिळणार का, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. ४विशेषत: नीरा शाखेतून पंधरा वर्षांतून प्रथमच किरण आळंदीकर यांनी अर्ज दाखल केला आहे. ते सराफआणि सोनार समाजाचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांची निवड होऊन आपल्याला प्रतिनिधी मिळणार का, याकडे नीरा-सोमेश्वरवासीयांचे लक्ष लागले आहे.