मंचर : वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथील सटवाजीबाबाचा पिंगळेमळा येथील रस्त्याचे काम झाले नसल्याने तेथील रहिवाशांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. या वस्तीवरील सर्व मतदारांनी मतदान न करण्याचा निर्णय गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीत घेतला आहे.वडगाव काशिंबेग गावच्या दक्षिणेला सटवाजीबाबा पिंगळेमळा ही अडीचशे लोकसंख्येची वस्ती आहे. मंचर घोडेगाव रस्त्यापासून या वस्तीकडे जाण्यास रस्ता असून तो पुढे खिरडमळामार्गे वडगावकडे गेला आहे. या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मागील वर्षीच्या पावसाळ््यात या वस्तीतून जाणारा दीड किलोमीटरचा रस्ता खड्डे, डबकी व चिखलयुक्त झाला होता. आताही रस्ता खड्डे व दगडांनी व्यापला आहे. रस्तादुरुस्तीची मागणी तीन वर्र्षांपासून केली जाते. पावसाळ््यात तर रस्ता पूर्णपणे बंद राहतो. रस्त्यावरील काळ््या मातीचा चिखल होऊन वाहतूक बंद होते. शेतीमाल वाहून नेण्यासाठी, शाळेतील मुलांसाठी रस्ता अडचणीचा ठरत आहे. रस्त्याची डागडुजी व्हावी, तसेच मुरुमीकरण व्हावे, यासाठी ग्रामस्थांनी अनेक फेऱ्या मारल्या. मात्र काम झाले नाही. म्हणून ग्रामस्थांची नाराजी आहे.
पिंगळेमळा ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
By admin | Updated: February 11, 2017 02:47 IST