शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पिंकेथॉन ही महिला परिवर्तनाची सुरुवात : मिलिंद सोमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 18:12 IST

पुणे पिंकेथॉनची सुरुवात २६ नोव्हेंबर रोजी मुलिक ग्राउंड, कल्याणी नगर येथून  होणार आहे.

ठळक मुद्देपिंकेथॉन ही केवळ मॅरेथॉन नसून परिवर्तनाची सुरुवात पिंकेथॉनमध्ये ५० दृष्टिहीन मुली सहभागी होणार आहेत.या मुलींसाठी खास ब्रेल लिपीत असणारे पदक तयार करण्यात आले आहे.

पुणे : ‘महिला सशक्तीकरणासाठी महिलांनी स्वत: प्रयत्न करणे आवश्यक आहे. सशक्तीकरण हे केवळ महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याशी निगडित नसून, महिलांचे आरोग्यही तितकेच महत्वाचे आहे, असे मत पिंकेथॉनचे संस्थापक मिलिंद सोमण यांनी पाचव्या पिंकेथॉनची घोषणा करताना व्यक्त केले. पुणे पिंकेथॉनची सुरुवात २६ नोव्हेंबर रोजी मुलिक ग्राउंड, कल्याणी नगर येथून  होणार आहे.ते म्हणाले, ‘पिंकेथॉन ही केवळ मॅरेथॉन नसून परिवर्तनाची सुरुवात आहे. ही चळवळ भारतातील महिलांना सक्षमतेसाठी प्रयत्न करायला एक व्यासपीठ निर्माण करून देईल. आपल्या स्वत: च्या आरोग्यावर नियंत्रण ठेवणे, स्वत:चा सन्मान करणे आणि आपल्या मूल्यांना समजून घेऊन त्यांचा सन्मान करणे, हे सक्षमीकरणाचे पहिले पाऊल आहे हे याद्वारे महिलांना समजून घेता येईल. याही वर्षी पुणेकर मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवतील.’यावेळी धावपटू मान कौर, अभिनेत्री सई ताम्हणकर आदी मान्यवर उपस्थित होते. पिंकेथॉनमध्ये ५० दृष्टिहीन मुली सहभागी होणार आहेत. या मुलींसाठी खास ब्रेल लिपीत असणारे पदक तयार करण्यात आले आहे. मुख्य दिवसासाठी त्यांच्यासाठी डोळस धावपटूंच्या मदतीने खास प्रशिक्षण सत्रांची रचना केली आहे.  ३ किमीमध्ये पळणार्‍या दृष्टिहीन मुलींच्या स्क्वाडसाठी निवांत व्हिजनमधील दृष्टिहीन मुलगी अभया मुकुंद हिची शुभंकर म्हणून घोषणा झाली आहे. या  प्रकारात  ३० श्रवणशक्ती बाधित मुलीही भाग घेणार आहेत. कर्करोगातून वाचलेल्या मिताली उपाध्ये यांची ५ किमी श्रेणी रनसाठी शुभंकर म्हणून घोषणा झाली आहे.