शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

पिंपरी भाजीमंडईत तब्बल तीन टन कैरी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 11:56 IST

आवक होऊनही गवार, भेंडी, घोसाळीचे दर वाढले

ठळक मुद्देइतर भाज्यांचे दर स्थिर

पिंपरी: सातारा, सांगली-मिरज येथून लोणच्याच्या कैरीची पिंपरी येथील भाजी मंडईत तीन टन आवक झाली. तसेच इंदूर येथून महाबळेश्वर गाजरही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाले. तसेच आवक होऊनही गवार, भेंडी व घोसाळीचे दर या आठवड्यात वाढले आहेत. तर इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत.

उन्हाळ्यात लोणच्याच्या कैरीला मोठी मागणी असते. त्याअनुषंगाने सातारा, सांगली व मिरज भागातून पिंपरी येथील भाजीमंडईत रविवारी लोणच्याच्या गावरान कैरीची मोठी आवक झाली. प्रतिकिलो ५० रुपये दराने या कैरीची विक्री झाली. तसेच इंदूर येथून दाखल झालेल्या महाबळेश्वर गाजरलाही ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. अहमदनगर येथून गावरान वांगी दाखल झाली आहेत. तर जुन्नर भागातून चवळीची आवक वाढली आहे. प्रतिकिलो ५० ते ६० रुपये दराने चवळीची विक्री होत आहे. उन्हाळ्यामुळे लिंबूला मागणी वाढली आहे. प्रतिशेकडा ३०० ते ३५० रुपये लिंबूचा दर आहे. बटाटा व कांद्याचा दर सध्या आवाक्यात आहे. तसेच पालेभाज्यांचेही दर स्थिर आहेत. 

सध्या इंदूर येथील महाबळेश्वर गाजराला आणि काकडीला चांगली मागणी आहे. लोणच्यासाठी गावरान कैरीला ग्राहकांची पसंती आहे. कोरोनामुळे खबरदारी घेऊन भाजीपाला विक्री केली जात आहे.                                                                                                                       - संजय वाडेकर, विक्रेता

कोरोना व उन्हाळ्यामुळे फळभाज्या खरेदीला पसंती आहे. मात्र काकडी, गाजर, घोसाळी, गवार, लिंबू यांच्या दरात वाढ होत आहे. तर पालेभाज्या उन्हामुळे टिकत नाहीत. त्यामुळे मोठी अडचण होत आहे.                                                                                                                                  ऋची गुप्ता, गृहिणी फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो) बटाटे: १५ ते २०, कांदे: २० ते ३०, टोमॅटो: १० ते १५, गवार (गावरान): ७० ते ८०, सुरती गवार: ८०, दोडका: ५० ते ६०, घोसाळी: ६० ते ७०, लसूण: ८० ते १००, आले: ३० ते ४०, भेंडी: ६०, वांगी: ४०, गावरान वांगी: ३० ते ४०, काळी वांगी: १५ ते २०, कोबी: १५ ते २०, शेवगा: २० ते २५, काळी मिरची: ६० ते ७०, हिरवी मिरची: ६०, शिमला मिरची: ५०, पडवळ: ५० ते ६०, दुधी भोपळा: ४० ते ४५, लाल भोपळा: २०, काकडी: ३० ते ४०, चवळी: ५० ते ६०, काळा घेवडा: ७० ते ८०, तोंडली: ६० ते ७०, गाजर: २० ते २५, वाल: ६० ते ७०, राजमा: ८०, मटार (वटाणा): ८० ते ९०, कारली: ५० ते ६०, पावटा: ६०, श्रावणी घेवडा: ६० ते ७०, बिट: ३०, फ्लॉवर: ३०, तोतापुरी कैरी (कर्नाटक): ३० ते ४०, गावरान कैरी (लोणच्याची): ५० ते ६० लिंबू (शेकडा): ३०० ३५०.

पालेभाज्यांचे भाव (प्रति गड्डी)कोथिंबीर: १०, मेथी: १०, शेपू: १०, पालक: १०, मुळा: १५, तांदुळजा: १०, करडई: १०, आंबटचुका: १०, चवळी: १०, हिरवा माठ: १०, राजगीरा: १०, पुदिना: ५, आंबाडी: १०, कांदापात: १५, हरबरा: १०, गवती चहा: ८ ते १०, लालबिट: १०.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMangoआंबाMarketबाजार