ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. २४ - टी.व्ही. रिमोटशी खेळता खेळता चिमुकलीने बटन सेल गिळल्याची घटना पिंपरीमध्ये घडली आहे. क्रांती पाटील असे त्या बालिकेचे नाव असून ती अवघी दीड वर्षांची आहे. क्रांती घरात रिमोटशी खेळत होती, खेळता खेळता तिने बटण सेल तोंडात टाकला, थोड्या वेळाने तिला अस्वस्थ वाटू लागले असता घडला प्रकार पालकांच्या लक्षात आला. तिला उपचारांसाठी सासवडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात असून तिच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे.
खेळता खेळता लहान मुलांनी सेल गिळल्याची दोन महिन्यातील तिसरी घटना आहे.