शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पे पार्किंगविरोधात पालिकेत आंदोलने; विविध राजकीय पक्ष, संस्था आणि संघटना एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 04:14 IST

विविध राजकीय पक्ष, संस्था आणि संघटना यांनी एकत्र येऊन महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर शहरातील वाहतूक पार्किंग शुल्कआकारणी धोरणाच्या विरोधात शुक्रवारी आंदोलन केले. या वेळी सत्ताधारी भाजपाच्या निषेधार्थ घोषणाही देण्यात आल्या.

पुणे : विविध राजकीय पक्ष, संस्था आणि संघटना यांनी एकत्र येऊन महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर शहरातील वाहतूक पार्किंग शुल्कआकारणी धोरणाच्या विरोधात शुक्रवारी आंदोलन केले. या वेळी सत्ताधारी भाजपाच्या निषेधार्थ घोषणाही देण्यात आल्या. सुरक्षारक्षकांनी दोन्ही प्रवेशद्वारे बंद केल्यामुळे पालिकेसमोरच्या रस्त्यावर वाहतूककोंडी झाली. आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी व निदर्शने करण्यात आली.स्थायी समितीने मंजूर केलेले वाहनतळ धोरण अंतिम मान्यतेसाठी शुक्रवारी तातडीने स्थायी समितीसमोर आणण्यात आले. रस्त्यावर लागणाऱ्या प्रत्येक वाहनाला या धोरणानुसार शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे त्याविरोधात वातावरण निर्माण झाले आहे. त्याचेच प्रत्यंतर पालिकेसमोरच्या आंदोलनात आले. संभाजी ब्रिगेड, पतित पावन, भीम छावा आदी संघटनांनी आंदोलन केले. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते बैल जोडलेला मोठा गाडा घेऊन आले होते. काहींनी टांगा आणला होता. दोन्ही प्रवेशद्वारांवर गर्दी झाली होती. घोषणांनी पालिकेचा परिसर दणाणला होता. पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी नागरिकांनाही आत जाण्यास मनाई केली. त्यांच्या उद्धट व आडमुठेपणाच्या वागण्यामुळे वाद सुरू झाला. त्याचा फटका आजी-माजी महापौरांनादेखील बसला. त्यांना काही काळ महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ताटकळत उभे राहावे लागले. सभेचे कामकाज सुरू होताच शिवसेना व मनसेच्या सदस्यांनी भाजपाच्या निषेधाच्या घोषणा देत सभागृहात गोंधळ केला. मनसेचे वसंत मोरे, साईनाथ बाबर डोक्यावर खेळण्यातील वाहने बांधून आले होते.शिवसेनेचे गटनेते संजय भोसले व अन्य सदस्य काळे शर्ट, टोप्या परिधान करून आले होते.

टॅग्स :Parkingपार्किंग