शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थक्षेत्र विकास आराखडा : पालखीतळाच्या कामात अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 02:49 IST

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत इंदापूरसह सराटी व निरवांगी येथे पालखीतळाची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. कामांच्या पूर्ततेसाठी १२० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

इंदापूर - तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत इंदापूरसह सराटी व निरवांगी येथे पालखीतळाची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. कामांच्या पूर्ततेसाठी १२० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.पालखी येण्यापूर्वी येत्या जून महिन्याच्या आधी कामे पूर्ण व्हावीत, असा कामाचा वेग असणे अपेक्षित आहे. मात्र, इंदापूर व निरवांगी येथील कामासाठी नैसर्गिक वाळूच्या तुटवड्यासह निरवांगीच्या ग्रामस्थांचा संरक्षक भिंत बांधण्यास असलेला विरोध, सराटी येथील पालखीच्या नियोजित जागेवरील अतिक्रमणे, झाडेझुडपे व सखल जागेमुळे पाण्याचा निचरा होण्यात येणारी अडचण यामुळे कामात अडथळे येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.शासनाच्या नियोजन विभागाच्या श्रीक्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत इंदापूरच्या पालखीतळाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ शनिवारी झाला. इंदापूर येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या जागेत १ कोटी ३० लाख ७९ हजार रुपये खर्च करून पालखीतळ उभारण्याचे नियोजन आहे.सभामंडप, अंतर्गत रस्ते वसेप्टिक टँक असे या कामाचे स्वरूप आहे. सभामंडप व सेप्टिक टँकची खोदाई पूर्ण झाली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून जागेसंदर्भात येणारी अडचण दूर करण्यास आमदार भरणे यांनी प्रयत्न केले असले, तरी नैसर्गिक वाळूचा तुटवडा हा येथील कामातील मोठी अडचण आहे. शहरातील इतर बांधकामांप्रमाणे दगडाच्या चुºयाने बांधकाम करावे लागणार आहे.अतिक्रमणे हटविण्याचेही आहे आव्हानसराटीच्या पालखीतळासाठी ४ कोटी ३७ लाख ६ हजार ६०० रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. संरक्षक भिंत, कमान, अंतर्गत रस्ते, सेप्टिक टँक असे या कामाचे स्वरूप आहे.पालखीतळाच्या नियोजित जागेवर अतिक्रमणे आहेत. झाडेझुडपे वाढलेली आहेत. त्याच्या साफसफाईची तरतूद कामाच्या अंदाजपत्रकात नाही. ही जागा सखल असल्याने पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था नाही. अद्याप येथे काम सुरू झालेले नाही.निरवांगी येथील पालखीतळासाठी २ कोटी ४८ लाख ४ हजार १०० रुपये खर्चाची तजवीज करण्यात आली आहे. संरक्षक भिंत, कमान, सेप्टिक टँक असे कामाचे स्वरूप आहे. संरक्षक भिंत व सेप्टिक टँकची खोदाई पूर्ण झाली आहे. मात्र, निरवांगीच्या ग्रामस्थांनी स्मशानभूमीसाठी नदीकाठापासून एक एकर जागेकरिता संरक्षक भिंत बांधण्यास मज्जाव केला आहे. स्थानिक शेतकºयांचाही त्याला विरोध आहे.

टॅग्स :Puneपुणे