शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘मेपल’कडून फोटोंसाठी परवानगी नाही

By admin | Updated: April 20, 2016 00:38 IST

मेपल ग्रुपने परवानगी न घेता जाहिरातीत आमचे फोटो वापरले आहेत़ सरकार म्हणून त्यांच्यावर कारवाई करणार आहोत़ याबाबत जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांना आपला अहवाल सादर करतील.

पुणे : मेपल ग्रुपने परवानगी न घेता जाहिरातीत आमचे फोटो वापरले आहेत़ सरकार म्हणून त्यांच्यावर कारवाई करणार आहोत़ याबाबत जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांना आपला अहवाल सादर करतील. त्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले़ मेपलने ५ लाखांत घरे अशी जाहिरात करुन त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांची छायाचित्रे वापरली होती़ त्यामुळे ही शासकीय योजना असल्याचा भास होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या़ याविषयी बापट म्हणाले, क्रेडाईचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांचा कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी फोन आला होता. परंतु, जायला जमले नाही़ वृत्तपत्रात जाहिरात आली, तेव्हा ग्रहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांना फोन करुन योजनेबाबत विचारले़ तेव्हा त्यांनीही काहीही माहिती नसल्याचे सांगितले़ मुख्यमंत्र्यांकडे विचारले असता, आपण कार्यक्रमाला येऊ हे कन्फर्म केले नसल्याचे सांगितले़ राज्य अथवा केंद्र सरकारची परवानगी न घेता अशी योजना सुरु केली असेल, तर त्यांनी फॉर्म विक्री थांबवावी़ जे ग्राहक या योजनेत येऊ इच्छित नाही, त्यांना त्यांचे पैसे परत करावेत़ त्यांनी म्हाडामार्फत आपली योजना केंद्र सरकारकडून मंजूर झाल्यावरच योजना सुरु करावी़ तोपर्यंत फॉर्मची विक्री थांबवावी़़ जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल दिल्यानंतर मुख्यमंत्री याबाबत पुढील कारवाईचा निर्णय घेतील, असे बापट यांनी सांगितले़ दरम्यान, या योजनेच्या नावाखाली स्वस्त घरांचे स्वप्न दाखवून फसवणूक होत असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवाजीनगर येथील मेपल ग्रुपच्या कार्यालयाची मोडतोड केली. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. ११५० रुपये भरून घेऊन नोंदणी केली जात आहे. हजारो लोकांनी या योजनेत नावनोंदणी केली आहे. मात्र, काहीच जणांना घरे मिळणार आहेत. त्यामुळे मनसेच्या वतीने कार्यालयावर धडक मारून आंदोलन करण्यात आल्याचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले. या आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष बाळा शेडगे, नगरसेवक रवींद्र धंगेकर, कामगार सेनेचे नरेंद्र तांबोळी, उपाध्यक्ष जयराज लांडगे, सचिन पांगारे, विभागाध्यक्ष प्रशांत मते, साईनाथ बाबर, आशिष साबळे, संजय भोसले, रवींद्र खेडेकर आदींनी सहभाग घेतला. मेपल कंपनीने केलेल्या जाहिरातीनुसार ते खरंच इतक्या कमी किमतीत घरे उपलब्ध करुन देऊ शकतात का, याची पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमून चौकशी करावी. त्यांच्या आराखड्यांची कडक तपासणी करावी़ जर त्यात तथ्य असेल, तर त्यांना एक हजार घरे बांधून दाखविण्याचे बंधन घालावे व यात शेवटापर्यंत जावे, असे मत आमदार डॉ़ नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले़ (प्रतिनिधी)