शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पेट्रोल पंपातून आले पाणीमिश्रीत पेट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 02:16 IST

कात्रज-देहू बायपासवरील आंबेगाव बुद्रुक येथील शहीद ले. कर्नल प्रकाश पाटील या इंडियन आॅईल कंपनीच्या पेट्रोलपंपावर बुधवारी दुपारी साडेतीन ते सहाच्या सुमारास पेट्रोलमधून पाणी

आंबेगाव बुद्रुक : कात्रज-देहू बायपासवरील आंबेगाव बुद्रुक येथील शहीद ले. कर्नल प्रकाश पाटील या इंडियन आॅईल कंपनीच्या पेट्रोलपंपावर बुधवारी दुपारी साडेतीन ते सहाच्या सुमारास पेट्रोलमधून पाणी विकले गेल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहने रस्त्यातच बंद पडली.तसेच अनेक वाहने क्रेन लावून गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी नेण्यात आली. काही जणांनी पेट्रोल पंपावर समक्ष येऊन भेसळयुक्त भरलेले पेट्रोल ओतले. अखेर भारती विद्यापीठ पोलीस ठाणे अंकित आंबेगाव पठार पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक पृथ्वीराज ताटे व एस. एम. खानविलकर व सहकारी पेट्रोलपंपावर पोचले व पेट्रोलपंप तातडीने बंद केला.भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हवेलीचे तहसीलदार प्रशांत पिसाळ यांना तत्काळ बोलावून घेतले. तहसीलदारांनी पेट्रोल कंपनी आयओसीचे प्रतिनिधी प्रसाद साठे आणि शुभम अग्रवाल यांच्याकडून पंचासमक्ष स्टोअरेज टँकची तपासणी करून पंचनामा केला. स्टोअरेज टँकमधील एकूण ९६३५ लिटर साठ्यामध्ये तब्बल ५५४ लिटर पाण्याची भेसळ असल्याचे आढळून आले आहे.तहसीलदारांकडून पेट्रोलचे नमुने सील बंद करून तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात आले. पेट्रोलपंप चालकाने अनेकजणांचे पेट्रोलचे पैसे परत दिल्याने तसेच गाडी दुरुस्तीचा खर्च उचलण्याची तयारी दाखवल्याने अजूनपर्यंत गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. मात्र पेट्रोलमधील इथेनॉलशी पाण्याचा संपर्क आल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. अधिक तपास ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले करत आहेत.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंप