शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'...कशी तुझी जिरवली आता भर शंभरचं!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 17:16 IST

बारामती: अलीकडे कोणाचाही पेट्रोल पंप असला तरी तेथे त्यांचा ( पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा) फोटो लावायचाच असा नियम केला ...

बारामती: अलीकडे कोणाचाही पेट्रोल पंप असला तरी तेथे त्यांचा ( पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा) फोटो लावायचाच असा नियम केला आहे. त्यामुळे आम्ही गंमतीने असे म्हणतो की पेट्रोल १०० च्या पुढे गेलं की पेट्रोल भरताना तुम्ही त्यांच्याकडे बघायचं, मग ते म्हणतात कशी तुझी जिरवली... घाल आता १०० रुपयाचे पेट्रोल अशा शब्दात मिश्कील टीप्पणी करीत  उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य मेटाकुटीस आला आहे. त्यातच बहुतांश पेट्रोलपंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी एमआयडीसीतील एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी केलेली मिश्कील टीप्पणी चर्चेचा विषय ठरली आहे.

'पवारांचा पेट्रोल पंप असला तरीही फोटो मात्र मोदींचाच'- अजित पवार

यावेळी पवार म्हणाले, आम्ही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून अनेक उत्तम प्रकारे काम करणारे पंतप्रधान आपल्या देशाला मिळाल्याचे पाहिले. आता पंतप्रधान पदावर मोदी साहेब आहेत. त्यांनी अलीकडे कोणाचाही पेट्रोल पंप असला तरी तेथे त्यांचा (मोदींचा) फोटो लावायचाच असा नियम केला आहे.पेट्रोल भरताना  त्यांच्याकडे बघायचं, मग ते म्हणतात कशी तुझी जिरवली. घाल आता १०० रुपयाचे पेट्रोल या पवार यांनी पंतप्रधानांना केलल्या टीपणीवर उपस्थिांमध्ये हशा पिकला.

वाढत्या इंधनदरावर सर्वसामान्य ग्राहक पेट्रोलपंपावर इंधन भरताना या ठीकाणी लावलेल्या पंतप्रधानांच्या फ्लेक्सकडे पाहत उपरोधिकपणे हात जोडल्याचे काही व्हीडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. आता खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मिश्कील टीप्पणी करीत दरवाढीकडे लक्ष वेधले आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNarendra Modiनरेंद्र मोदी