शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘सनबर्न’विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 02:41 IST

गेल्या तीन वर्षांपासून वादग्रस्त ठरत असलेल्या सनबर्न फेस्टिव्हलला याही वर्षी नागरिकांच्या विरोधाला सामना करावा लागत आहे.

पुणे  - गेल्या तीन वर्षांपासून वादग्रस्त ठरत असलेल्या सनबर्न फेस्टिव्हलला याही वर्षी नागरिकांच्या विरोधाला सामना करावा लागत आहे. लवळे येथे होत असलेल्या सनबर्न फेस्टिव्हलला इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना लागू असलेले नियम लावावेत, अशी मागणी करणारी याचिका सोमवारी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.भाजपाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी अ‍ॅड. राहुल म्हस्के यांच्यामार्फेत परसेप्ट प्रा. लि. च्या विरोधात ही याचिका दाखल केली आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत याचिकाकर्त्यांना अधिक कागदपत्रे जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.सनबर्न फेस्टिव्हल हा एक गैरसांस्कृतिक तसेच पाश्चात्य अस्वीकृत पद्धतीने राबविण्यात येणारा कार्यक्रम आहे. यामध्ये संस्कृतीचा ºहास होत आहे. फेस्टिव्हलमुळे पर्यावरण, वृक्ष, टेकड्या, डोंगर यांचे नुकसान होत आहे. याकडे दुर्लक्ष होत आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.मर्यादा ओलांडलीदहीहंडी, गणपती आणि इतर सणांच्या वेळी डीजी व डॉल्बीचा वापर करण्यावर अनेक निर्बंध घालण्यात येतात. मात्र सनबर्नमध्ये सर्रास डीजेचा वापर होतोे. ७० डेसिबलची मर्यादा देखील ओलांडली जाते. या कार्यक्रमातून कोणताही सामाजित संदेश जात नाही. कार्यक्रमाला बंदी घालावी, अशी आमची मागणी नाही, पण नियम सर्वांना सारखा असावा, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती याचिकाकर्ते नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिली.सद्य परिस्थिती मध्ये लवळे गावाच्या परिसरात सनबर्न हा कार्यक्रम होण्याच्या मार्गावर असून या कार्यक्रमामुळे या परिसरातील तरुण पिढीवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे असे कार्यक्रम इथे होता कामा नयेत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हा कार्यक्रम या परिसरात आम्ही होऊ देणार नाही.- भाऊ केदारी,माजी उपसरपंच, लवळे

टॅग्स :Sunburn Festivalसनबर्न फेस्टिव्हलCourtन्यायालय