शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पेशवाईतील सरदार अंबाजीपंत पुरंदरे वाडा

By admin | Updated: May 11, 2017 04:05 IST

सासवडचा कऱ्हाकाठ खूप महत्त्वपूर्ण आहे. येथील सासवडनगरीतील जुन्या एका वाड्याला तेवढीच ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.

गणेश मुळीक । लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : सासवडचा कऱ्हाकाठ खूप महत्त्वपूर्ण आहे. येथील सासवडनगरीतील जुन्या एका वाड्याला तेवढीच ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. पुण्याचा शनिवारवाड्याअगोदर २० वर्षे बांधलेला येथील ‘आबासाहेब पुरंदरे वाडा’ म्हणजे या नगरीचे चिरेबंदी सौंदर्यच आहे! या वाड्याचे पुढे खिंडार पडले व थोडी पडझड झाली, तरी काही भाग सुस्थितीत आहे. तटबंदी मजबूत आहे. त्यामुळे आताचे मालक जय पुरंदरे करू इच्छित असलेले ऐतिहसिक संग्रहालय या वाड्यात साकारले, तर पुन्हा या वैभवला झळाळी मिळेल.कऱ्हाकाठावरील पुरंदरे घराण्याचे संस्थापक व पेशव्यांचे दिवाण अंबाजीपंत पुरंदरे यांनी १७१०मध्ये हा पुरंदरे वाडा बांधला. ते साताऱ्याचे शाहू महाराज यांचे मुतालिकही होते. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या काळात कुलकर्णी वतनदार म्हणून त्रिंबक पुरंदरे होते. शाहूंना गादीवर बसविण्यात या अंबाजीपंत पुरंदरे यांनी बाळाजी विश्वनाथ भट (पेशवे) यांच्यासह आघाडी घेतली होती. हा पुरंदरे वाडा चार एकर क्षेत्रावर सातचौकी पद्धतीने बांधलेला आहे. चाळीस हजार चौरस फुटांचे बांधकाम यात आहे. ३०० वर्षांपूर्वी कऱ्हाकाठाची खडकाळ जागा खास निवडून हा चिरेबंद तटबंदीचा व आत चारमजली असलेला वाडा बांधला.पुरंदरे यांचे पूर्वज पूर्वी हत्तीवरून अंबारीतून यायचे; त्यामुळे बाहेरचा मुख्य दरवाजा अंबारीसह हत्ती आत येईल एवढा होता. एखाद्या किल्ल्याचे वा गढीचे प्रवेशद्वार वाटावे, असे या वाड्याचे आतील मुख्य प्रवेशद्वार आहे. त्याला बुरूज, दगडात कोरलेल्या निरक्षण खाचा, लाकडी दारावर लोखंडी संरक्षक भलेमोठे खिळे, दगड, लाकूड, लोखंड, शिसे यांचे जोड प्रत्येक ठिकाणी आजही मजबूत आहेत. जेवढे बांधकाम वर दिसते तेवढीच जागा तळघरांनी व्यापली आहे. आड, विहीर, भुयारे, टेहळणी मनोरे चार दिशांना चार आहेत. फक्त भुयारे कुठपर्यंत जातात, याची खात्री झाली नाही. तीनशे वर्षांपूर्वीची रंगीत भित्तिचित्रे आजही आहेत, असे जय पुरंदरे यांनी सांगितले.