शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

गमावलेल्या माणसाला ‘त्यांनी ’ दिला ‘माणुसकी’ ने निरोप..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 15:08 IST

नोकरीनिमित्त उत्तर प्रदेशातील जालान जिल्ह्याच्या ईगोई गावचे रहिवासी असलेले गुडडू रामप्रसाद चौधरी व आजाद रामप्रसाद चौधरी हे दोघे बंधू सणसवाडी व कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे राहत होते.

ठळक मुद्देकोरेगाव भीमा येथील मॉर्निंग वॉक ग्रुप व जनकल्याण ट्रस्ट यांच्यावतीने सामाजिक एकतेचे दर्शनकोरेगाव भीमाच्या पोलीसपाटील मालन गव्हाणे व पोलीस यंत्रणेची मदत

कोरेगाव भीमा : आयुष्यात किमान अंत्यसंस्काराच्या विधी तरी नीट व्हावा, अशी मानवी जीवनात अपेक्षा असते. हजारो किलोमीटरवरून रोजगार व चरितार्थासाठी उत्तर प्रदेशातून कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे आलेल्या गरीब कुटुंबातील दोघा भावांपैकी एकाचा आकस्मिक मृत्यू झाला. भावाचे शव गावी नेणेही शक्य नसल्याने एकट्याने अंत्यसंस्कार कसे करणार ? असा सवाल दुसऱ्या भावाला पडला असतानाच कायम रस्त्यावरील अपघातांतील रुग्णांच्या मदतीला धावून येणाऱ्या कोरेगाव भीमा येथील मॉर्निंग वॉक ग्रुप व जनकल्याण सोशल ट्रस्टच्या सदस्यांनी मदतीचा हात पुढे करुन नातेवाईकांच्या भूमिकेतून विधिवत अंत्यसंस्कार करत मानवतेचे दर्शन घडवले.      नोकरीनिमित्त उत्तर प्रदेशातील जालान जिल्ह्याच्या ईगोई गावचे रहिवासी असलेले गुडडू रामप्रसाद चौधरी व आजाद रामप्रसाद चौधरी हे दोघे बंधू नोकरीनिमित्त सणसवाडी व कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे राहत होते. आजाद वढुत तर गुडडू सणसवाडीत कंत्राटी कामावर काम करीत होते. दरम्यान शनिवारी (ता. २८) रात्री आजादचा आकस्मिक मृत्यू झाला. आजादच्या अचानक जाण्याने गुड्डू हबकून गेला. मदतीला कोणी नसल्याने मृत्युनंतरचे पोस्टमार्टम तसेच पोलिसांकडील कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता, अ‍ॅम्ब्युलन्सने मृतदेह आणणे, यामुळे गुड्डू अगोदरच गडबडला  होता. मात्र कोरेगाव भीमाच्या पोलीसपाटील मालन गव्हाणे व त्यांचे पती रामदास गव्हाणे तसेच पोलीस यंत्रणेनेही यांनी या कामी गुड्डूला मदत करत दिलासा दिला.     मात्र, एकट्यानेच भाव आजाद याच्या देहावर अंत्यसंस्कार कोठे व कसे करायचे ? या विवंचनेत गुडडू होता. दरम्यान, ही बाब कोरेगाव भीमा येथील मॉर्निंग वॉक ग्रुप व जनकल्याण सोशल ट्रस्टच्या सदस्यांना समजली. या ग्रुपचे सदस्य व शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद तसेच जनकल्याण सोशल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेशकुमार सिंह, उपाध्यक्ष शैलेंद्रकुमार सिंह, सचिव सुरेंद्र उपाध्याय, खजिनदार चंद्रभूषण कुँवर असून सदस्य राजबहादूर चौबे, राजींद्र सिंह, सतवीर शर्मा, संतोष सिंह, मंगेश राठोड, अंजनी सिंह, विनोद यादव, दिनेश यादव, मणी पांडे, विनोद गुप्ता, गौतमकुमार ओम, सतीश पांडे, सुशील पांडे, पुरूषोत्तम सिंह, अखिलेश संतोष सिंह, सुमन कुँवर आदींसह सुमारे ३५ ते ४० सहकाऱ्यांनी मदतीसाठी धावत नातेवाईक व परिवाराची भूमिका पार पाडली. अनिल काशिद यांनी शववाहिका, सरपणासह अंत्यसंस्काराचे साहित्याची जमवण्यास व विधिवत अंत्यसंस्कारासही मोलाची मदत केली. तर इतरांनी त्यांना विधीवत अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या भूमिकेतून मदतीचा हात पुढे करत मानवतेचे दर्शन घडवले......    परप्रांतीय होके भी सहायता और नये रिश्तेदार मिले...सणसवाडी - कोरेगाव भीमा औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या शोधात उत्तरप्रदेश, बिहारसह विविध ठिकाणचे हिंदी भाषिक बांधव याठिकाणी स्थायिक झाले आहेत. या परिसरातील लोक एकमेकांच्या सुख दु:खात सहभागी होत असतानाच हजारो किलोमीटर अंतरावरून याठिकाणी येवूनही येथील स्थानिक लोकांशी एकरूप झाले आहेत. जनकल्याण सोशल ट्रस्टच्या माध्यमातून कोरेगाव भीमा व परिसरात अनेक गरजुंना मदत करून विविध सामाजिक उपक्रमही राबवत  असतात. या घटनेत ट्रस्टचे सदस्य वेळीच मदतीला आल्याने भारावलेला गुड्डू म्हणाला, दुरी की वजह से अंत्यसंस्कार के लिए कोई आ नही सका, लेकिन परदेशी होके भी मॉर्निंग वॉक ग्रुप और जनकल्याण ट्रस्टके माध्यमसे हमे सहायता भी मिली और नये रिश्तेदार भी मिल गये........ 

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव