शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्थायीची सदस्यनिवृत्ती ३० जानेवारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 05:39 IST

महापालिका स्थायी समितीचे आठ सदस्य ३० जानेवारीला निवृत्त होतील. कोण निवृत्त होणार ते समितीच्या सभेत चिठ्ठी काढून ठरवले जाईल.

पुणे : महापालिका स्थायी समितीचे आठ सदस्य ३० जानेवारीला निवृत्त होतील. कोण निवृत्त होणार ते समितीच्या सभेत चिठ्ठी काढून ठरवले जाईल. नव्या सदस्यांची नियुक्ती त्यानंतर फेब्रुवारीत होणाºया सर्वसाधारण सभेत होईल. स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी चुरस असल्यामुळे समितीचे सदस्य होण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.स्थायी समितीच्या १६ सदस्यांपैकी आठ सदस्य दरवर्षी निवृत्त होतात. पहिल्या वर्षी त्यांची नावे चिठ्ठी काढून ठरवली जातात. स्थायी समितीच्या ३० जानेवारीला होणाºया सभेत चिठ्ठी काढून निवृत्त सदस्यांची नावे निश्चित केली जातील. ज्या पक्षांचे जेवढे सदस्य निवृत्त होतील त्या जागेवर त्याच पक्षाचे तेवढे सदस्य नव्याने नियुक्त केले जातील. पक्षनेत्याने सर्वसाधारण सभेत ही नावे महापौरांकडे द्यायची असतात. ही सर्वसाधारण सभा फेब्रुवारीत होईल. सध्या समितीत भाजपाचे ११ सदस्य असून राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन व काँग्रेस, शिवसेना यांचा प्रत्येकी एक असे १६ सदस्य आहेत.समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचा कार्यकाल अद्याप शिल्लक आहे. त्यामुळे त्यांना दोन वेळा महापालिकेचा अर्थसंकल्प मांडता येणार आहे. त्यानंतर ते पदावरून पायऊतार होतील. त्यांनाच मुदतवाढ द्यावी, असाही एक मतप्रवाह पक्षात आहे. तसे झाले तर महापालिकेत प्रथमच स्थायी समितीच्या अध्यक्षाला सलग दुसºयांदा संधी दिली, असे होईल. पक्षात या पदासाठी सुरू झालेली रेस लक्षात घेता पक्षश्रेष्ठींकडून असा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त होते आहे. मात्र अध्यक्ष होण्यासाठी सत्ताधारी भाजपात बरेच जण बाशिंग बांधून बसले आहेत. त्याआधी सदस्य होणे गरजेचे असल्यामुळे त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.सुनील कांबळे, हेमंत रासनेतसेच राजेंद्र शिळीमकर यासाठी इच्छुक आहेत. यापैकी शिळीमकर मागील पंचवार्षिकमध्ये स्थायी समितीचे सदस्य होते. त्यामुळे रासने व कांबळे यांच्यात चुरस होण्याची शक्यता आहे.