शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाचा वाढला टक्का

By admin | Updated: October 16, 2014 05:57 IST

विधानसभा निवडणुकीसाठी मतदारराजाने मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून विविध मतदान केंद्रांत मतदारांनी रांगा लावून मतदान केले

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी मतदारराजाने मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून विविध मतदान केंद्रांत मतदारांनी रांगा लावून मतदान केले. भर उन्हातदेखील मतदारांचा उत्साह कायम होता. जिल्ह्यात सरासरी ६२.५ टक्के मतदान झाले असून, गेल्या निवडणुकीपेक्षा त्यात ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता रविवारी (दि. १९) होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत मतदानाची टक्केवारी वाढली असून, ३०८ उमेदवारांचे भवितव्य त्यावर ठरणार आहे. वाढलेले मतदान नक्की प्रस्थापितांच्या विरोधात जाणार की अन्य काही पर्याय समोर येतात, याबाबत आता खल सुरू झाला आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले होते. मतदारांनीदेखील तितक्याच उत्साहाने आपले कर्तव्य बजावून भरघोस मतदान केले. बहुतांश मतदारसंघांत पंचरंगी लढत असल्याने मतांचे धु्रवीकरण होऊन धक्कादायक निकाल हाती येतील, असे भाकीत वर्तविण्यात येत होते. तसेच, लढतीदेखील चुरशीच्या होतील, असा अंदाज होता. मात्र, मतदारांनी पुन्हा एकदा चकवा देऊन निकालाच्या अंदाजाचा पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे. गेल्या २००९च्या विधानसभा निवडणुकीत २१ मतदारसंघांची टक्केवारी ५४.४४ टक्के होती, तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ५७.४२ टक्के होती. रात्री उशिरा हाती आलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार जिल्ह्यात ६२.५० टक्के मतदान झाले होते.दरम्यान, मतदान वाढावे यासाठी मतदान केंद्रात मतदारांना नेण्यासाठी वाहने ठेवली होती. याशिवाय नातेगोते, मित्रपरिवार, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ‘आपल्या’ मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी उमेदवारांची यंत्रणा कार्यरत होती. तसेच, जिल्हा प्रशासनाचा ‘जागो मतदार’ रथही मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत होता. (प्रतिनिधी)