शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

लोकसहभागाचे पालिकेला वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 02:00 IST

शहरातील घनकचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. ही समस्या सोडविणे महापालिकेच्या हाताबाहेर गेल्याने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांचाच सहभाग घेऊन प्रत्येक प्रभागात

पुणे : शहरातील घनकचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. ही समस्या सोडविणे महापालिकेच्या हाताबाहेर गेल्याने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांचाच सहभाग घेऊन प्रत्येक प्रभागात लोकसहभागातून कचरा समस्या सोडविली जावी या उद्देशाने महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेले लोकनेते यशवंतराव शहर स्वच्छता अभियान महापालिकेने गुंडाळले आहे.महापालिकेच्या २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात या अभियानासाठी आधी महापालिका आयुक्तांनी आणि नंतर स्थायी समितीने एक दमडीही ठेवण्याची तसदी घेतली नसल्याने हे अभियान पुढील वर्षापासून बंद होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या अभियानाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. या वेळी त्यांनी राज्यात अशा प्रकारचे अभियान राबविणाऱ्या पुणे महापालिकेचे विशेष कौतुकही या कार्यक्रमात केले होते. राज्य शासनाच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या धर्तीवर लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्य जन्मशताब्दी निमित्ताने २०१२मध्ये तत्कालीन महापौर वैशाली बनकर यांनी पुढाकार घेऊन हे स्वच्छता अभियान सुरू केले होते. विशेषत: शहरातील घनकचरा व्यवस्थापनात नागरी सहभाग असावा तसेच, आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवावा या उद्देशाने ही स्पर्धा सुरू करण्यात आली होती. त्यात विजेत्या ठरणाऱ्या प्रथम प्रभागास विकासासाठी तब्बल २ कोटी रुपयांचे बक्षीस, दुसऱ्या क्रमांकाच्या प्रभागासाठी दीड कोटी, तिसऱ्या क्रमांकासाठी १ कोटी तर चौथ्या क्रमांकासाठी ७५ लाख रुपयांचे बक्षीस निश्चित करण्यात आले होते. या निधीतून विजेत्या प्रभागामध्ये स्वच्छता प्रकल्प तसेच स्वच्छतेशी संबंधित इतर उपक्रम राबविले जाणार होते. महापालिकेच्या अंदाजपत्रकात या अभियानासाठी विशेष तरतूदही करण्यात येत होती. २०१५-१६ च्या अंदाजपत्रकातही या अभियानासाठी तरतूद आहे. माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात या अभियानासाठी कोणतीही तरतूद नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे अभियान पुढील वर्षी बंद करण्यात येणार हे निश्चित झाले आहे. > गेल्या वर्षभरात शहरातील कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. शहरातील कचरा टाकण्यासाठी महापालिकेकडे जागाच नसल्याने शहरातील कचरा प्रभागातच जिरविण्यासाठी महापालिकेकडून भर दिला जात आहे. अशा स्थितीत नागरिकांमध्ये जनजागृती आणि प्रभागांमध्येच कचरा जिरविण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे ठरणार आहे. अशा स्थितीत प्रशासन तसेच स्थायी समितीकडूनही या अभियानाबाबत उदासीनता दाखविण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेकडून एका बाजूला पुणेकरांना स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखविले जात असताना; दुसरीकडे मात्र, शहराच्या स्वच्छतेसाठीचा लोकसहभाग प्रशासनास नकोसा झालेला असल्याचे समोर आले आहे. > प्रशासनाकडून स्वच्छ भारत अभियानां अंतर्गत विविध स्वच्छता उपक्रमांसाठी खर्च केला जात असल्याचे सांगितले. तसेच गेल्या वर्षात या अभियानाचे कोणतेही काम प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे तो निधी वाया गेला आहे. त्यातच महापालिका आयुक्तांनी स्वच्छभारत अभियानासाठी खर्च होत असल्याचे सांगितल्याने या अभियानासाठी निधी ठेवण्यात आलेला नाही. - अश्विनी कदम (माजी स्थायी समिती अध्यक्षा)