शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभांमध्ये लोकांचा सहभाग वाढविणार - सूरज मांढरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 02:01 IST

ग्रामसभांमध्ये लोकांचा सहभाग वाढवून विधायक कामे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेत नावीन्यपूर्ण योजनांबरोबर राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. नव्या गोष्टी, प्रयोग करण्याचा माझा प्रयत्न असून, वास्तूमधील १९ विभागांतील अधिका-यांनी जिल्ह्यात भेट देताना फक्त स्वत:च्या खात्याच्या कामाचीच पाहणी करू नये, तर सर्वच विभागांतील कामांची पाहणी करून तसा अहवाल द्यावा. प्रत्येक अधिकारी हा जिल्हा परिषदेचा दूत झाला पाहिजे. प्रत्येक खाते दुसºया खात्यांशी एकरूप असावे. जिल्हा परिषदेत कर्मचा-यांची संख्या मोठी आहे; त्यामुळे प्रत्येक कर्मचा-यामध्ये असलेल्या कौशल्याचा चांगला वापर करण्यावर भर राहील. तसेच, ग्रामसभांमध्ये लोकांचा सहभाग वाढवून विधायक कामे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.सूरज मांढरे म्हणाले, की जिल्हा परिषदेच्या पंंचायत विभागाचे १३ तालुक्यांत कार्यक्षेत्र असून, एकूण १,४०५ ग्रामपंचायती कार्यरत आहेत. या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावागावांमध्ये विकासाची कामे करण्यात येतात. या सर्व गावांतील ग्रामसभांमध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढवून विकासकामे शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणार आहे. त्या दृष्टीने सर्व नियमित बैठका घेऊन झालेल्या कामांचा आढावा आणि विविध उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविणार आहे.जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत, शिक्षण, आरोग्य, बांधकाम (दक्षिण व उत्तर), वित्त, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, सामान्य प्रशासन विभागासह इतर एकूण १९ विभाग आहेत. तसेच जिल्ह्यातील १३ पंचायत समित्या, असे मोठे कार्यक्षेत्र असणारी आणि राज्यातील सर्वांत मोठा अर्थसंकल्प असलेली पुणे जिल्हा परिषद एकमेव आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेअंतर्गत काम करणाºया कर्मचाºयांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी कर्मचारीहित सप्ताहाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सूरज मांढरे यांनी सांगितले.कर्मचारीहित सप्ताह साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करणार आहे़ त्याचबरोबर लोकशाही दिनाच्या धर्तीवर ‘कर्मचारी तक्रार निवारण दिन’ प्रत्येक महिन्याच्या पहिल्या अथवा दुसºया सोमवारी घेणार आहे.जिल्हा परिषदेत नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवसापासून कर्मचारी आपल्या तक्रारी व प्रलंबित प्रश्नांसाठी थेट अर्ज करू शकतील, अशी सोय केली आहे़ कर्मचाºयांनी केलेले अर्ज, तक्रारी त्याच दिवशी संबंधित विभागाकडे पाठविण्यात येतील.या अर्जांवर एक आठवड्यात कार्यवाही करण्यााच्या सूचना संबंधित सर्व खातेप्रमुखांना दिले आहेत. प्रलंबित प्रकरणे व तक्रारींवर केलेल्या कार्यवाहीचा गोषवारा ई-मेलद्वारे मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दर सोमवारी पाठविणे प्रत्येक खातेप्रमुखांवर बंधनकारक असेल़राज्यात सर्वाधिक मोठी आणि चांगली जिल्हा परिषद म्हणून पुण्याचा उल्लेख होतो. जिल्हा परिषदेचा पूर्वीपासून वेगळा नावलौकिक आहे. तिची वेगळी उंची आहे. ती उंची टिकविण्याबरोबर चांगल्या यशाच्या शिखरावर पोहोचविण्याचे आव्हान आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न असल्याचे सूरज मांढरे यांनी सांगितले.जिल्हा परिषदेच्या विविध खातेप्रमुखांनी जिल्हा दौरा करताना स्वत:च्या विभागासह इतर विभागांमध्येही जाऊन मूलभूत बाबींची पाहणी करावी; त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणारनाही. याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामांची गती वाढण्यास मदतहोणार असून, सर्वसामान्यांची होणारी गैरसोय टळेल.दररोज एखाद्या तरी अधिकाºयाचा दौरा जिल्ह्यात आयोजित केला जातो. त्या वेळी अधिकाºयाने स्वत:चे नियोजित काम सांभाळून जिल्हा परिषदेशी संबंधित विभागांमध्ये जाऊन तेथे नागरिकांना सोयीसुविधा दिल्या जातात का, त्यांची गैरसोय होते का किंवा त्यांना काय अडचणी भेडसावतात, याबाबत पाहणी करण्याची सूचना करण्यात आली आहे.त्यामुळे संबंधित ठिकाणचे कर्मचारी व अधिकाºयांना या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील विभागप्रमुख येऊन पाहणी करतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर प्रत्येक जण जागरूक राहील आणि नागरिकांच्या हितासाठी बांधील राहील, असा संदेश या माध्यमातून जाईल, असे मांढरे यांनी सांगितले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPuneपुणे