पुणो : वडगावशेरी येथील ‘स्टेला मेरी स्कूल’मधील इंग्रजी विषयाच्या शिक्षिकेने आठवीच्या विद्याथ्र्याना फरशीवर बसून एकच कविता पन्नासवेळा लिहिण्याची शिक्षा दिली.
शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यानंतर विद्याथ्र्याना अशी शिक्षा देता येते का, याची चौकशी करून शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. मराठी माध्यमाच्या शाळेपेक्षा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येच पाल्याने शिक्षण घ्यावे, असे पालकाला वाटते. परंतु, इंग्रजी माध्यमाच्या बहुतांश शाळांमध्ये पात्र शिक्षकांची नियुक्ती केली जात नाही. परिणामी विद्याथ्र्याशी कसे वागावे, याची समज त्यांना नसते. त्यामुळे शिक्षक विद्याथ्र्याना कोणतीही शिक्षा करतात. वास्तविक शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्याथ्र्याना शिक्षा करता येत नाही.
परंतु, स्टेला मेरी स्कूलच्या आठवीतील विद्याथ्र्याना पहिल्या दिवशी 25 वेळा कविता लिहून आणण्याची शिक्षा दिली. ज्या विद्याथ्र्यानी 15 ते 2क् वेळा कविता लिहिली, त्यांना दुस:या दिवशी शाळेत आल्यावर फरशीवर बसविले. तसेच त्यांना 5क् वेळा कविता लिहिण्याची शिक्षा दिली, असे एका पालकाने सांगितले. (प्रतिनिधी)