शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

Pedestrian Day: लक्ष्मी रस्त्यावर साेमवारी वॉकिंग प्लाझा, वाहनांना ‘नाे एन्ट्री’; बसच्या मार्गातही बदल

By भाग्यश्री गिलडा | Published: December 09, 2023 6:56 PM

वॉकिंग प्लाझा संपल्यानंतर सर्व बस पूर्ववत मार्गाने संचलनात राहतील, असे पीएमपी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे....

पुणे : पादचारी दिनाचे औचित्य साधून पुणे महापालिकेकडून सोमवारी (दि. ११) लक्ष्मीरोडवर (उंबऱ्या गणपती चौक ते गरूड गणपती चौक) वॉकिंग प्लाझा करण्यात येणार आहे. त्यामुळे लक्ष्मीरोडवरून संचलनात असलेल्या बसच्या मार्गात सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बदल करण्यात येणार आहे. वॉकिंग प्लाझा संपल्यानंतर सर्व बस पूर्ववत मार्गाने संचलनात राहतील, असे पीएमपी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

असा असेल वाहतुकीत बदल :

- बस मार्ग क्र. ७ व ९ अटल पुण्यद्शम हे मार्ग बंद राहील.

- बस मार्ग क्र. ५५, ५८, ५९ हे बस मार्ग शनिपारकडे येताना कुमठेकररोडमार्गे नियमित मार्गाने आणि शनिपारकडून जाताना अ. ब. चौक, नारायण पेठ, अलका टॉकिज चौकातून पुढे नियमित मार्गाने संचलनात राहतील.

- बस मार्ग क्र. ५७ या मार्गावरील बस पुणे स्टेशनकडून जाताना बस मार्ग क्रं ९४ ने नारायणपेठ मार्गे अलका टॉकीज चौक व पुढे नियमित मार्गाने संचलनात राहतील.

- बसमार्ग क्र. ८१, १४४, १४४ अ, १४४ क व २८३ या मार्गावरील बस पुणे स्टेशनकडे जाताना नियमित मार्गाने व पुणे स्टेशनकडून येताना मनपामार्गे संचलनात राहतील.

- बसमार्ग क्र. १७४ या मार्गावरील बस पुणे स्टेशनकडून एनडीएकडे जाताना सिटी पोस्टपर्यंत नियमित मार्गाने व पुढे सिटी पोस्ट चौकातून डावीकडे वळून स्वारगेट, सारसबाग, टिळकरोड, डेक्कन कॉर्नर व पुढे नियमित मार्गाने एनडीएकडून पुणे स्टेशनकडे येताना सदर मार्गावरील बस नियमित मार्गाने संचलनात राहतील.

- बस मार्ग क्र. १९७ व २०२ या मार्गावरील बसेस हडपसरकडून कोथरूड डेपो /वारजे माळवाडीकडे जाताना सिटी पोस्टपर्यंत नियमित मार्गाने व पुढे सिटी पोस्ट चौकातून डावीकडे वळून स्वारगेट, सारसबाग, टिळकरोड, डेक्कन कॉर्नर व पुढे नियमित मार्गाने कोथरूड डेपो वारजे माळवाडीकडून हडपसरकडे येताना सदर मार्गावरील बस नियमित मार्गाने संचलनात राहतील.

- बस मार्ग क्र. ६८ या मार्गावरील बसेस अप्पर डेपोकडे जाताना नियमित मार्गाने व अप्पर डेपो कडून सुतारदराकडे येताना टिळकरोड मार्गे संचलनात राहतील.

दर तीस मिनिटांनी फेऱ्या :

'वॉकिंग प्लाझा' कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी नगरकर तालीम चौक (नूमवि चौक)- बाजीराव रोड-मनपा-नगरकर तालीम चौक (नूमवि चौक) या मार्गावर ३० मि. वारंवारीतेने, स्वारगेट-उंबऱ्या गणपती चौक - स्वारगेट या मार्गावर ४० मि. वारंवारीतेने व डेक्कन-उंबऱ्या गणपती चौक - डेक्कन या मार्गावर ३० मि. वारंवारीतेने जादा बसचे नियोजन केले आहे. शिवाजीनगर सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन येथून येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी बसमार्ग क्र. २ शिवाजीनगर रेल्वे स्टेशन ते स्वारगेट या मार्गावरील बसेस सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन मार्गे ४ मि. वारंवारीतेने संचलनात ठेवण्यात येणार आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड