शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

PCMC | राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवल्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘जम्बो भरती’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 13:47 IST

शासनाने मंजुरी दिल्यानंतर महापालिकेकडून जम्बो नोकर भरती केली जाणार आहे...

पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहराचा होणारा विस्तार तसेच वाढलेला कामाचा ताण लक्षात घेऊन आकृतिबंधामध्ये सुधारणा केली आहे. सुरुवातीला महापालिकेच्या आकृतिबंधात एकूण ११ हजार ५१३ विविध पदांना मंजुरी मिळाली होती. आकृतिबंधात सुधारणा करून पुन्हा पदसंख्या वाढविली आहे. त्यात तब्बल ५ हजार ३२५ पदांची निर्मिती केली आहे. त्यामुळे तब्बल १६ हजार ८३८ पदांचा सुधारित आकृतिबंध तयार झाला आहे. शासनाने मंजुरी दिल्यानंतर महापालिकेकडून जम्बो नोकर भरती केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश ‘ब’ वर्गात झाला आहे. तसेच, वाढती लोकसंख्या आणि कामकाजाचा वाढलेला ताण लक्षात घेता अधिक संख्येने अधिकारी व कर्मचारी आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका सामान्य प्रशासन विभागाकडून सुधारित आकृतिबंध तयार आहे. त्यात विविध गटांतील एकूण १६ हजार ८३८ पदे आहेत. पूर्वीच्या आकृतिबंधाच्या तुलनेत ५ हजार ३२५ पदांची नव्याने निर्मिती केली आहे.

दरम्यान, जुना आकृतिबंध तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या काळात तयार केला होता. त्या काळातच त्या आकृतिबंधास राज्य शासनाने मंजुरी दिली होती. मात्र, नोकरभरतीस बंदी असल्याने तसेच कोरोना महामारीमुळे ती पदे भरता आली नाहीत. केवळ वैद्यकीय, आरोग्य तसेच अत्यावश्यक विभागातील नोकर भरतीस राज्य शासनाने हिरवा कंदील दिला होता. त्यामुळे ११ हजार ५१३ पैकी केवळ ७ हजार ५३ पदे सध्या कार्यरत होती. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे.

अधिवेशन झाल्यानंतर मान्यता?नव्या आकृतिबंधाचा प्रस्ताव नुकताच राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यास महापालिका ही जम्बो नोकर भरती प्रक्रिया राबविणार आहे. प्रथम अत्यावश्यक विभागातील पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून मान्यता मिळणे आवश्यक आहे.

मे महिन्यात होणार ‘ही’ भरतीमहापालिकेच्या वतीने खासगी संस्थेमार्फत वैद्यकीय विभागातील परिचारिका व इतर पदांसाठी परीक्षा व मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, आरोग्य निरीक्षक, अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक, सहायक उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अॅनिमल किपर व समाजसेवक अशा एकूण ३८६ पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी तब्बल १ लाख ३० हजार अर्ज ऑक्टोबर २०२२ पर्यंत प्राप्त झाले आहेत. ही परीक्षा मे महिन्यामध्ये होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सुधारित आकृतिबंध राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. अधिवेशन झाल्यानंतर त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मंजुरी मिळाल्यानंतर महापालिकेमध्ये भरती प्रक्रिया राबवता येईल. त्यामध्ये अत्यावश्यक विभागांमध्ये भरती करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.- विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग.

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाjobनोकरी