शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हमीपत्र घेऊनच पदनाम प्रकरणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 11:55 IST

राज्यातील ६ विद्यापीठांमधील अडीच हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाची मान्यता न घेता परस्पर पदनाम बदलून वेतनश्रेणीमध्ये मोठी वाढ करून घेतली होती.

ठळक मुद्देव्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णयराज्य शासनाने मूळ पदांवर पाठविण्याचे तसेच त्यांच्या वेतनाची वसुली करण्याचे दिले आदेशशासनाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे डिसेंबर महिन्यांपासून सुधारीत वेतन अदा केले जाणे अपेक्षित

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातील पदनाम प्रकरणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सुधारीत वेतन निश्चित झाल्यानंतर जादा घेतलेली रक्कम परत करायची याबाबत हमीपत्र लिहून घेऊन त्यांना वेतन अदा करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. राज्यातील ६ विद्यापीठांमधील अडीच हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाची मान्यता न घेता परस्पर पदनाम बदलून वेतनश्रेणीमध्ये मोठी वाढ करून घेतली होती. ही वेतनवाढ थांबवून त्यांना पुन्हा मूळ पदांवर पाठविण्याचे तसेच त्यांच्या वेतनाची वसुली करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. वित्त विभागातील अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत त्यानुसार त्यांच्या वेतनाची फेरनिश्चिती केली जात आहे. मात्र त्यास वेळ लागत असल्याने या कर्मचाऱ्यांचे वेतन कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत निर्णय घेण्यासाठी सोमवारी व्यवस्थापन परिषदेची बैठक बोलावण्यात आली होती.  पदनाम गैरव्यवहारामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन होण्यास केवळ एक दिवसांचा उशीर झाला तरी त्यांनी लगेच काम बंद आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने त्यांना तातडीने अ‍ॅडव्हान्स पगाराची रक्कम जमा केली होती. राज्य शासनाच्या परिपत्रकामधील मुदद क्रमांक ६ नुसार या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी असे शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार वेतनात कपात करण्याच्या निर्णयाची मात्र तातडीने अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. मात्र समितीकडून अद्याप वेतनाची फेररचना झाली नसल्याने त्याची अंमलबजावणी करण्यात अडथळे येत आहे.  विद्यापीठ प्रशासनाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे डिसेंबर महिन्यांपासून सुधारीत वेतन अदा केले जाणे अपेक्षित आहे. त्यामुळे कर्मचाºयांना वेतननिश्चिती झाल्यानंतर त्यानुसार जादा अदा झालेली रक्कम परत करावी लागेल....................पदनाम प्रकरणी राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकामधील मुदद क्रमांक ६ नुसार या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार वेतनात कपात करण्याची अंमलबजावणी त्वरीत होणे आवश्यक आहे. त्यामुळे यासाठी नेमण्यात आलेल्या समितीकडून वेतनाची फेरनिश्चिती कधी होणार याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे................................या अटीवर वेतन दिले जाणारपदनाम बदल प्रकरणात सहभाग नसलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्ववत वेतन दिले जाईल. पदनाम बदललेल्या कर्मचाºयांकडून मात्र लेखी हमी पत्र घेण्यात येणार आहे. त्यानुसार सुधारित वेतनश्रेणी निश्चित झाल्यांनतर त्यातील फरकाची विद्यापीठाला परत करावी लागेल या अटीवर वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठसमितीकडून कधी होणार वेतनाची फेरनिश्चिती

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठfraudधोकेबाजीGovernmentसरकार