शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बिल भरून वीजपुरवठा सुरळीत, दूरध्वनीसेवा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 01:44 IST

बँकांचे व्यवहार पूर्ववत; ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल, आदिवासी बांधवांना दिलासा

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये मागील महिन्यापासून बीएसएनएल कंपनीच्या मनोऱ्याचे वीजबिल थकबाकी असल्यामुळे मनोऱ्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. भारत दूरसंचार लिमिटेड (बीएसएनएल) कंपनीची दूरध्वनी सेवा बंद झाल्यामुळे या भागात असणाºया बँकांचे व्यवहार ठप्प झाले होते. याबाबत ‘लोकमत’ने वारंवार य्वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा केल्याने बीएसएनएल कंपनीने तत्काळ या मनोऱ्यांचे वीजबिल भरून वीजपुरवठा सुरळीत करून दूरध्वनी सेवा सुरू केली आहे. यामुळे बँकाचे व्यवहार नियमित झाले आहेत. याबाबत आदिवासी बांधवांनी ‘लोकमत’चे मनोमन आभार मानले.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भाग हा डोंगरदºया खोºयांमध्ये विस्तारलेला आहे. काही वर्षांपूर्वी या आदिवासी भागात आदिवासी जनतेचा संपर्क इतरत्र व्हावा, यासाठी तळेघर, राजेवाडी, डिंभे या गावांमध्ये बीएसएनएल कंपनीचे मनोरे उभारण्यात आले. यामुळे या भागातील आदिवासी जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला.जगाच्या कानाकोपºयात असलेल्या आपल्या मुलामुलींशी व नातेवाइकांशी संपर्क होऊ लागला. यामुळे या परिसरात बीएसएनएल कंपनीचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढू लागले. त्याचप्रमाणे भीमाशंकर, पाटण, आहुपे या खोºयांतील आदिवासी जनतेचा आर्थिक प्रश्न कायमचा सुटावा, यासाठी तळेघर, अडिवरे, डिंभे येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा सुरू करण्यात आल्या.यानंतर या बँका आॅनलाइन जोडण्यात आल्या; परंतु एक महिन्यापासून बीएसएनएल कंपनीच्या मनोºयाचे वीजबिल थकबाकी असल्यामुळे मनोºयांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.भारत दूरसंचार लिमिटेड कंपनीची दूरध्वनी सेवा बंद झाल्यामुळे या भागातील बँकांचे व्यवहार ठप्प झाले. यामुळे आदिवासी जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांना बँकेतील हक्काचे पैसे काढता येत नव्हते. याची दखल घेऊन ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त वारंवार प्रसिद्ध करून पाठपुरावा केल्याने बीएसएनएल कंपनीने तत्काळ या मनोºयांचे वीजबिल भरून वीजपुरवठा सुरळीत करून दूरध्वनी सेवा सुरू केली आहे.पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखा आॅनलाइन झाल्यामुळे नेटवर्क असल्याशिवाय बँकेचे व्यवहार करता येत नाहीत. एका महिन्यापासून दूरध्वनी सेवा बंद झाल्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. रेंज नसल्यामुळे ग्राहकांना रिकाम्या हताने परतावे लागत असत, दूरध्वनी सेवा सुरू झाल्यामुळे बँकेचे व्यवहार सुरळीत चालू झाले आहेत.- संकल्प शिंदे,शाखाधिकार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा तळेघरवीजबिल थकीत असल्यामुळे एका महिन्यापासून तळेघर येथील बीएसएनएल कंपनींच्या मनोºयाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. वीजबिल भरल्यानंतर तत्काळ हा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.-दिनेश झोनवाल, कनिष्ठ अभियंता, घोडेगाव

टॅग्स :BSNLबीएसएनएलbankबँक