शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

वापरा आणि फेका ही पवार यांची नीती

By admin | Updated: March 14, 2015 23:35 IST

वापरा आणि फेका ही पवारांची नीती आहे. मागील वीस वर्षांपासून काकडे घराण्याला हाताशी धरून पवारांनी केवळ सत्तेची पोळी भाजली.

सोमेश्वरनगर : वापरा आणि फेका ही पवारांची नीती आहे. मागील वीस वर्षांपासून काकडे घराण्याला हाताशी धरून पवारांनी केवळ सत्तेची पोळी भाजली. राज्यातील सर्वाधिक घोटाळेबाज नेता कोण हे महाराष्ट्राला ठाऊक आहे़ सोमेश्वरच्या आर्थिक डबघाईला अजित पवार देखील जबाबदार आहेत, असा आरोप कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक शहाजी काकडे यांनी केला. काकडे कुटूंबातील मोठ्या नेत्याने पवारांच्या विरोधात बंड केल्याने तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. ६) होळ (ता. बारामती) येथे झालेल्या सभेत कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे व राजवर्धन शिंदे यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले. त्यानंतर राष्ट्रवादीचे बडे नेते असलेले शहाजी काकडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शरद पवार व अजित पवार यांच्यावर थेट हल्लाबोल केला. सोमेश्वर सोसायटीत २२ कोटी रूपयांचा घोटाळा झाला, असे पवार यांचे म्हणणे आहे. मात्र मी सोमेश्वर कारखान्याचा अध्यक्ष असताना माझ्या बंधुंनी चुकीच्या तारणावर कर्ज उचलले. मात्र, ज्या बँकेने हे २२ कोटी कर्ज मंजूर केले. ती बँक आज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. त्यामुळे तुम्ही पण या घोटाळ््याला कारणीभूत आहात. पवार म्हणतात सोमेश्वर सर्वसेवा संघात ३ कोटी २२ लाखाचा गैरव्यहार झाला. ६ महिन्यापूर्वी पुणे येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये झालेला खर्च कारखाना कामासाठी झाला आहे, असे खर्च करावे लागतात. याबाबत पवार यांनीच स्पष्ट कबुली संचालक मंडळासमोर दिली होती. आज मात्र पवार पुन्हा एकदा राजकीय पोळी भाजण्यासाठी माझ्यावर चुकीचे आरोप करीत आहेत. सोमेश्वर ने आतापर्यंत विविध प्रकल्प उभारले आहेत. यासाठी कोट्यावधी रूपयांची कर्जे मंजूर करावी लागली आहेत. हे सर्व शरद पवार यांच्या मदतीमुळे घडले. तर शरद पवार यांचे सर्वाधिक प्रेम असलेल्या माळेगाव कारखान्याला त्यांची मदत का नाही झाली, असा टोला त्यांनी लगावला. अध्यक्षपदाच्या काळात सोमश्वरच्या सभासदांचा करोडो रूपये फायदा करून दिला आहे. काकडे कुटुबियांनी हा कारखाना उभारल्यामुळे हे सर्व मी कारखान्यासाठी केले, असे काकडे म्हणाले. (वार्ताहर)पारंपरिक विरोधक म्हणून पवारांनी केवळ माझा वापर करून घेतला. नंतर माझा सूडबुद्धीने बळी देणे मी समजू शकतो, मात्र सदैव पवार यांच्याशी प्रामाणिक राहणारे राजवर्धन शिंदे यांचा जाहीरपणे पाणउतारा करणे, म्हणजे वापरा आणि फेका ही पवारांची नीती आहे. माझ्या अध्यक्षपदाच्या काळात जो काही उसाला दर दिला तो अजित पवारांनाच विचारून दिला. मात्र माझी जनमानसात प्रतिमा मलीन करण्यासाठी आज माझ्यावर अजित पवार खोटेनाटे आरोप करीत आहेत. वास्तविक राज्यातील सर्वाधिक घोटाळेबाज कोण आहे, हे महाराष्ट्राला ठाऊक आहे. स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी गावागावांत, घरांघरात भांडणे लावून राजकीय पोळी भाजून घेत ‘फोडा आणि झोडा’ ही नीती पवारांनी नेहमीच वापरली आहे.- शहाजी काकडे, संचालक, सोमेश्वर कारखाना