बेल्हा : ‘बेल्हा-राजुरी जिल्हा परिषद गटात माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. विरोधक फक्त कामाचे श्रेय लाटण्याचे प्रयत्न करीत आहेत,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे उमेदवार पांडुरंग पवार यांनी केला.रानमळा (ता. जुन्नर) येथे बेल्हा पंचायत समिती गणाचे उमेदवार अनघा घोडके, राजुरी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सारिका औटी यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत पवार बोलत होते. पांडुरंग पवार म्हणाले, की या परिसरात अनेक विकासकामे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झाली आहेत. विरोधक कामाचे फक्त श्रेय लाटण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. या वेळी सरपंच सुरेश तिकोणे, वर्षा गुंजाळ, गंगूबाई गुंजाळ, धनश्री गुंजाळ, कविता पाबळे, अनघा घोडके यांनी मनोगत व्यक्त केले.या वेळी दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिल्लारी, गुलाबनबी बेपारी, अतुल भांबेरे, मंगरूळचे सरपंच भानुदास खराडे, प्रदीप पिंगट, धोंडीभाऊ पिंगट, खंडू गुंजाळ, शिवाजी गुंजाळ, गंगाराम गुंजाळ, सखाराम गुंजाळ, सविता दरेकर, अशोक गुंजाळ आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
विरोधकांचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न : पवार
By admin | Updated: February 15, 2017 01:47 IST