शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पवार हे अनेक योजनांचे जनक : वळसे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 01:01 IST

शरद पवार हे अनेक योजनांचे जनक आहेत.

राजगुरुनगर : शरद पवार हे अनेक योजनांचे जनक आहेत. १९७२ च्या दुष्काळात ‘फूड फॉर हंगर’ घोषणेने स्वाभिमान दुखावल्याने त्यांनी बारामतीत ‘फूड फॉर वर्कर’ हा प्रयोग राबविला. त्यातून पुढे रोजगार हमी योजना जन्मास आली. १९९० च्या बीजिंग आॅलिंपिक स्पर्धेत कबड्डी स्पर्धेस प्रवेश देण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ‘घर तेथे संकरित गाय’ ही योजना त्यांनी प्रत्यक्षात राबवून श्वेतक्रांती घडविली. अशा अनेक योजनांचे शरद पवार हे जनक आहेत, असे प्रतिपादन सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केले.हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या ‘लोकनेते शरदरावजी पवारसाहेब : संसदीय कारकिर्दीचा सुवर्णमहोत्सव’ या विषयावरील ज्ञानदीप वार्षिक विशेषांक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. देवेंद्र बुट्टे पाटील होते. याप्रसंगी आमदार सुरेश गोरे, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, मानद सचिव हरिभाऊ सांडभोर, संचालक कोंडीभाऊ टाकळकर, बाळासाहेब सांडभोर, सुशील शिंगवी, डॉ. रोहिणी राक्षे, अश्विनी मोरमारे, किसन गारगोटे, उमेश आगरकर, सुभाष टाकळकर, अ‍ॅड. माणिक पाटोळे, अंकुश कोळेकर, मुरलीधर खांगटे, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, प्रबंधक कैलास पाचारणे उपस्थित होते.दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या आहारी न जाता अभ्यास, करिअरवर लक्ष केंद्रित करावे.या वार्षिक अंकाचे संपादन डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे यांनी, तर आभारप्रदर्शन प्रा. जी. जी. गायकवाड यांनी केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार