शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पवारांना घाबरलो नाही, ‘हे’ किस झाड की पत्ती

By admin | Updated: June 2, 2017 02:18 IST

माझ्याविरुद्ध लढणारांची मी कधीच चिंता करत नाही. मी शरद पवारांना घाबरलो नाही, तर बाकीच्यांचे काय? माझ्याविरुद्ध अपप्रचार

लोकमत न्यूज नेटवर्कभोसरी : माझ्याविरुद्ध लढणारांची मी कधीच चिंता करत नाही. मी शरद पवारांना घाबरलो नाही, तर बाकीच्यांचे काय? माझ्याविरुद्ध अपप्रचार करणारे किस झाड की पत्ती, अशी खरमरीत टीका खासदार शिवाजीराव आढळराव यांनी आमदार महेश लांडगे यांचे थेट नाव न घेता केली. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची अफवा पसरवणे हे बालिशपणाचे लक्षण आहे, असे त्यांनी सांगितले. महापालिका सर्वसामान्यांच्या रस्ते, पाणी, आरोग्य या मूलभूत प्रश्नांसाठी खर्च करण्यासाठी दहा वेळा विचार करते आणि दारूची दुकाने चालू करण्यासाठी नाशिक फाटा ते मोशी महामार्ग ताब्यात घेऊन त्यावर एक हजार कोटी खर्च करण्यास तयार आहे, अशी महापालिकेच्या कारभारावरही त्यांनी भोसरीतील पत्रकार परिषदेत बोलताना टीका केली. भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुलाचे कामही तीर्थक्षेत्र विकास निधीतून होऊ शकत होते त्यासाठी भरमसाठ खर्च महापालिका करत असून सर्वसामान्यांना मूलभूत सुविधा देण्यास कमी पडत आहे. त्यामुळे या कामांवर नियंत्रण असणे व चुकीच्या कामांची गंभीर दाखल घेणे गरजेचे आहे, असे आढळराव पाटील यांनी सांगितले. शिवसेनेच्या नेत्यांचे भाजपाकडून खच्चीकरणभाजपचे राज्य सरकार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविरोधात गळचेपीची भूमिका घेत असल्याचे दिसून येते. भाजपाच्या ग्रामपंचायत सदस्यांचीही कामे सरकार करते, शिवाय राष्ट्रवादीच्याही काही नेत्यांची कामे सहजपणे होतात, पण शिवसेना सत्तेत असूनही आमची कामे राज्य सरकार करत नाही. हे शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचे सरकारी धोरण आहे, अशी टीका आढळराव पाटील यांनी केली.