शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पवारांनी पुरंदरच्या जनतेला फसविले- विजय शिवतारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 02:02 IST

गेली पन्नास वर्षे पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेने पवारांवरती प्रेम केले. मात्र त्यांनी सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली.

भुलेश्वर : गेली पन्नास वर्षे पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेने पवारांवरती प्रेम केले. मात्र त्यांनी सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली. पुरंदरसाठी कोणत्याही प्रकारचे ठोस काम करता आले नाही. पंधरा वर्षांत गुंजवणी धरणाला वीट लावता आली नाही. गेल्या पन्नास वर्षांत पवारांनी पुरंदरच्या जनतेला फसवले असल्याची टीका राज्याचे जलसंपदा व जलसंधारण मंत्री विजय शिवतारे यांनी केली.पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील वाघापूर येथे विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन शिवतारे यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते.शिवतारे म्हणाले, की राज्यामध्ये पुरंदर तालुका सर्वाधिक पुढे असेल. या ठिकाणी नियोजित विमानतळाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. फक्त राजकीय विरोध राहिला आहे. पुरंदरच्या रस्त्यांची कामेसुद्धा आता जोमात सुरु आहेत असल्याने आता बारामतीकडे झुकण्याची गरज नसल्याचे टोला त्यांनी लगावला.या वेळी जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, ज्योती झेंडे, पुरंदर पंचायत समितीच्या सभापती अर्चना जाधव, माजी सभापती अतुल म्हस्के ,पंचायत समिती सदस्य रमेश जाधव, रमेश इंगळे, युवा सेना अध्यक्ष मंदार गिरमे,उमेश गायकवाड, गणेश मुळीक, वाघापुरच्या सरपंच छाया वाघमारे, उपसरपंच सारिका कुंजीर, नरेश कुंजीर, मनोज कुंजीर, प्रविण कुंजीर, बाळासो इंदलकर, नितिन कुंजीर परिसरातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.>गुंजवणी धरणाल तेराशे कोटींची मान्यतातालुक्याला वरदान ठरणाऱ्या गुंजवणी धरणाचे काम प्रगतिपथावर आहे. तेराशे तेरा कोटींची मान्यता मिळाली आहे. पन्नास कोटींचा निधीही आहे. फेब्रुवारीच्या अधिवेशनात पुढील निधी येईल. यामुळे गुंजवणीला निधी कमी पडणार नाही. यामुळे पुढील पंधरा दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरू केले जाईल.