पवनानगर : पिंपरी-चिंचवडसह अर्ध्या मावळ तालुक्याचा पाण्याचा स्रोत असलेल्या पवना धरणात अवघा १८ टक्के इतका पाणीसाठा राहिला आहे. धरणाच्या ४५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात इतका कमी पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाची पाणी पातळी ६०१ मीटर असून, ४५.७२ इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. पवना धरणातून सध्या दररोज पाच तास १२०० क्सुसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. शिल्लक पाणीसाठा ३० ते ४० दिवसच पुरू शकतो. मात्र, धरणात असलेला गाळ यामुळे पाण्याच्या साठ्यात अधिक घट होऊ शकते. गतवर्षी पवना धरणात २३ मेला ३४ टक्के इतके पाणी शिल्लक होते. या तुलनेत या वर्षी १६.१० इतका पाणीसाठा कमी आहे. यामुळे ५० टक्के पाणीकपातीची आवश्यकता आहे. अद्याप धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात केवळ एक तास कपात केली आहे. शेतीसाठी पाण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे शेतीसाठी पाणी कमी प्रमाणात सोडावे.
पवना धरण गाठतेय तळ
By admin | Updated: May 24, 2016 05:56 IST