शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पवना धरण आटले आता, पड पड रे पावसा...

By admin | Updated: June 19, 2016 04:41 IST

पवना धरणाने तळ गाठला असून, १३% इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ४० वर्षांच्या इतिहासात जून महिन्यात पहिल्यांदाच इतका कमी पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस

पवनानगर : पवना धरणाने तळ गाठला असून, १३% इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ४० वर्षांच्या इतिहासात जून महिन्यात पहिल्यांदाच इतका कमी पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस लांबल्याने चिंता आणखी वाढली आहे.मागील वर्षी २०१५मध्ये पाऊस कमी झाल्याने पवना धरण अवघे ८० टक्के इतके भरले होते. या वर्षी अर्धा जून संपला, तरीदेखील पाऊस सुरू न झाल्याने धरणाची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. धरण हे नदीसारखे दिसू लागले आहे. आजअखेर धरण पाणलोट क्षेत्रात फक्त २३ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. उपयुक्त साठा ३३ घनमीटर आहे. यामुळे पाण्याची समस्या आता तीव्र होण्याची भीती आहे. धरणातून दररोज १२०० क्युसेसने ६ तास पाणी विसर्ग होत आहे. यात आता सोमवारपासून बदल करण्यात येणार असून, ४०० क्युसेसने पाणी विसर्ग केला जाणार आहे. यामुळे आता पाणीकपातीसोबत पाणी जपून वापरावे लागणार आहे. आकाशात ढग दिसत असले, तरी पाऊस मात्र नसल्याने पावसाची अजून किती काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे, हा चिंतेचा विषय आहे. मागील पाच वर्षांचा विचार केला असता १८ जून अखेर पडलेला पाऊस याचा विचार करता सर्वात कमी पाणीसाठा या वर्षी आहे. तर सर्वांत कमी पाऊस २००१ साली झाला होता. तो फक्त १६३१ मिलिमीटर इतका होता. तर सर्वांत जास्त पाऊस २००५ साली झाला होता. तो ६५६८ इतका झाला होता.२०११ साली २ जून रोजी सर्वांत लवकर पाऊस सुरू झाला होता. त्या वर्षी जून महिन्यात ७७३ इतक्या पावसाची नोंद झाली होती. त्या वेळी पावसाची प्रतीक्षा करावी लागली नाही.गाळ काढण्याचे नियोजन न झाल्याने वाळूमाफीयाप्रमाणे माजी माफीया तयार होऊन वाद वाढत गेल्याने गाळ उपसा शासनाने थांबवला आहे. पुढील वर्षी महापालिकेने खर्च करून हा गाळ फक्त शेतकऱ्यांच्या शेतासाठीच द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या वर्षी मातीमधून वीटभट्टी व्यवसायाचा मोठा फायदा झाला. व काहींनी यातून लाखोंची कमाई केली. पाण्याची इतकी गरज असताना पवना धरणाचे मजबुतीकरण मात्र गेल्या १६ वर्षांपासून रखडले आहे. यावर २४ कोटींपैकी १० कोटी खर्च झाला आहे. मात्र, १० कोटींचा निधी मजबुतीकरण धरणग्रस्तांनी थांबविल्याने पडून आहे.धरणात १० टीएमसी पाणी साठवण क्षमता असतानादेखील धरणाच्या किरकोळ डागडुजीवर या वर्षी १ रुपयादेखील खर्च झालेला नाही. धरणाचे काम पूर्ण होऊन ४० वर्षे झाली आहेत. यामुळे धरणाची किरकोळ डागडुजी करणे गरजेचे आहे. मात्र, याकडे पूर्ण दुर्लक्ष असून, धरणाच्या किरकोळ कामासाठी किमान ३० लाखांपर्यंतचा खर्च करून योग्य ती डागडुजी होणे गरजेचे आहे, असे शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी सांगितले.