शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत बेड मिळवण्यासाठी रुग्णाला करावी लागते कसरत, आता रुग्णवाहिका मिळण्यातही अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 11:31 IST

रुग्णाला घेऊन तासंतास फिरल्याने रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन संपण्याची भीती

ठळक मुद्देगंभीर रुग्णांना दाखल करण्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिकेची गरज

पिंपरी: शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजन आणि आयसीयू बेड मिळणे कठीण झाले आहे. परिणामी रुग्णांना रुग्णवाहिकेतूनच तास अन तास फिरावे लागत असल्याची स्थिती आहे. एका रुग्णाला एक ते दोन तास घेऊन फिरल्याने रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन संपतो. त्यामुळे ऐनवेळी काय करावे असा प्रश्न रुग्णवाहिका चालकाला आणि रुग्णाच्या नातेवाईकाला पडतो. सध्या ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने रुग्णवाहिकेला ऑक्सिजन मिळण्यास अडचण येत आहे.

 पुणे आणि पिंपरीत सध्या गंभीर रुग्णांची संख्या वाढल्याने कार्डियाक रुग्णवाहिका आणि इतर रुग्णवाहिकांची मागणी वाढली आहे. त्यामुळे रुग्णवाहिका मिळण्यास वाट पहावी लागत आहे. वाट पाहून रुग्णवाहिका मिळते. पण बेड मिळत नसल्याचे चित्र सध्या शहरात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात ऑक्सिजन बेड नाही मिळाला तर रुग्णाला पुण्यात घेऊन जावे लागते. तर पुण्यातला रुग्णाला बेड नाही मिळाला तर पिंपरी मिळेल या आशेने  तो येतो. पण इथेही त्याला बेड मिळत नसल्याची स्थिती आहे. रुग्ण संख्या वेगाने वाढत असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. खाजगी रुग्णवाहिका १५० 

महापालिका रुग्णालयासाठी उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका : ३७, इनोव्हा तत्सम प्रकारची वाहने : ५८मिनी बस : २,  एकूण ९७ कार्डियाकची सर्वाधिक मागणी 

गंभीर रुग्णांना दाखल करण्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिकेची गरज असते. परंतु या रुग्णवाहिका कमी असल्याने वेळेत मिळणे कठीण झाले आहे. तक्रार कुठे करायची ? 

रुग्णवाहिका वेळेत मिळाली नाही ? किंवा जादा पैसे मागितले तर तक्रार कुठे करायची असा प्रश्न आहे. अनेकांना या बाबत माहितीच नाही. त्यामुळे याचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. विचारणा केली असता 

पिंपरी ते पुणे जाण्यासाठी सध्या १५०० रुपये घेतले जात आहे. पूवी १२०० घेतले जात होते. आता ऑक्सिजनचे डिझेलचे भाव वाढल्याने १५०० घेत आहे. सध्या जवळपास ९० टक्के रुग्णवाहिकेत ऑक्सिजन आहे. बेड मिळणे कठीण झाल्याने एकाच रुग्णासाठी जास्त वेळ लागत आहे. त्यामुळे इतर रुग्णांना रुग्णवाहिका मिळण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. असे रुग्णवाहिका चालकाने सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल