शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

संसदीय समितीची ‘एफटीआयआय’,‘भांडारकर’ला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:20 IST

पुणे : देशभरात विविध कलांचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आणि इन्स्टिट्यूट कार्यरत आहेत. कलांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शिक्षणपद्धतीत ...

पुणे : देशभरात विविध कलांचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आणि इन्स्टिट्यूट कार्यरत आहेत. कलांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शिक्षणपद्धतीत बदल किंवा सुधारणा करण्याची गरज आहे का? हे जाणून घेण्याकरिता शिक्षण, महिला, बाल, युवक आणि क्रीडा या विभागाच्या संसदीय समितीचे शिष्टमंडळ सध्या देश दौऱ्यावर आहे. या शिष्टमंडळाने पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेला मंगळवारी (दि. ३१) भेट दिली.

संसदीय समितीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे असून, समितीमध्ये राज्यसभा आणि लोकसभेच्या सर्वपक्षीय २१ खासदारांचा समावेश आहे. समितीतील १२ खासदारांनी मंगळवारी एफटीआयआयमध्ये बैठक घेऊन चित्रपट शिक्षणाच्या प्रचारासाठी एफटीआयआयने काय पावले उचलली यावर चर्चा केली. या वेळी एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला, चित्रपट विभागाचे अधिष्ठाता धीरज मेश्राम, दूरचित्रवाणी विभागाचे अधिष्ठाता संदीप शहारे, कुलसचिव सय्यद रबीहाश्मी, लेखा अधिकारी मीनल काकडे आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट विभागाच्या संचालक धनप्रीत कौर यांच्यासह एफटीआयआयच्या काही माजी विद्यार्थ्यांनाही बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले होते.

संसदीय समितीने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेलाही भेट दिली. संस्थेचे अध्यक्ष नंदू फडके आणि नियामक मंडळाचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी स्वागत केले. सर्व सदस्यांना संस्थेची माहिती देण्यात आली. शंभर वर्षे झालेल्या संस्थांना केंद्र सरकारने शंभर कोटी रुपये निधी दिला होता. भांडारकर संस्थेनेही शताब्दी साजरी केली असून शंभर कोटी रुपये निधी उपलब्ध झाला तर रामायण, महाभारत आणि बुद्ध तत्त्वज्ञान पोहोचलेल्या देशांचे केंद्र भांडारकर संस्थेत आकार घेऊ शकते, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आल्याचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी सांगितले.

--------------------------------------------------------

देशभरात आर्ट्स, कल्चरल, परफाॅर्मिंग आणि फाईन आर्ट्सचे शिक्षण दिले जाते. त्या शिक्षणात कोणकोणत्या सुधारणा करायला हव्या. त्याविषयी समिती पाहणी करून संस्थांशी चर्चा करीत आहे. त्यासंदर्भात समितीने एफटीआयआय आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेला भेट दिली. नुकतीच चेन्नईच्या कलाक्षेत्र इन्स्टिट्यूटला देखील भेट देण्यात आली असून, दोन दिवसांनी मुंबईच्या गंधर्व संगीत महाविद्यालय, पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे गुरुकुल व जे.जे स्कूल आॅफ आर्ट्सला भेट देणार आहोत. या संस्थांची पाहणी करून समिती सरकारला अहवाल सादर करणार आहे.

- डॉ. विनय सहस्रबुद्धे, अध्यक्ष, संसदीय समिती

---------------------