शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमप्रकरणात पालकांनी समजूतदारपणा दाखवावा : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 14:49 IST

प्रेमप्रकरणातून होणाऱ्या हत्या,आत्महत्या रोखण्यासाठी आंतरजातीय विवाहांविषयी समाजात जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देआनंद कांबळे यांच्या खुन्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे

पाषाण : प्रेमप्रकरणाविषयी भूमिका घेण्याअगोदर पालकांनी मुलांची बाजू समजून घेणे आवश्यक आहे. कुटुंबाने घेतलेल्या अगदी टोकाच्या निर्णयातून पाल्यांनी आयुष्य संपवले जाण्याच्या घटना समाजात वाढत आहे. ही समाजासाठी भूषणावह गोष्ट नाही. समाजातील जातीपातींचे निर्मूलन हे आंतरजातीय विवाहातूनच होवू शकते. तसेच आनंद कांबळे यांच्या खुन्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, असे मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. दिवंगत आनंद कांबळे यांच्या स्मरणार्थ आयोजित शालेय विद्यार्थी सन्मान व शालेय साहित्य वाटपप्रसंगी ते औंध येथील पंडित भीमसेन जोशी नाट्यगृह येथे बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, परशुराम वाडेकर, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका सुनिता वाडेकर, डॉ. वासुदेव गाडे, भूपेश धुलकर, नगरसेवक बंडू ढोरे, नगरसेवक विजय शेवाळे, नगरसेविका सोनाली लांडगे,मंदार जोशी आदी उपस्थित होते. आठवले म्हणाले,सर्वसमाजाविषयी सुरक्षिततेची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. तसेच प्रेमप्रकरणातून होणाऱ्या हत्या,आत्महत्या रोखण्यासाठी आंतरजातीय विवाहांविषयी समाजात जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे. याप्रसंगी माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे म्हणाले, समाजासाठी स्वत:ला विसरून काम करण्याची आठवण जपली पाहिजे. समाजाच्या शंकास्पद वातावरणात आपण आपल्या लोकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. यावेळी चारशेहून अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले.  

टॅग्स :AundhऔंधRamdas Athawaleरामदास आठवले