शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने आई-वडिलांची आत्महत्या, पुण्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 04:18 IST

चार वर्षाच्या मुलाला फिट येऊन मृत्यू झाल्याचा धक्का आई-वडिलांना सहन झाला नाही. त्यामुळे संगणक अभियंता आणि त्याच्या पत्नीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरूवारी रात्री

पुणे : चार वर्षाच्या मुलाला फिट येऊन मृत्यू झाल्याचा धक्का आई-वडिलांना सहन झाला नाही. त्यामुळे संगणक अभियंता आणि त्याच्या पत्नीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरूवारी रात्री बाणेर येथे उघडकीस आली. सुमारे दोन दिवस तीनही मृतदेह घरात पडून होते. शेजाºयांनी पोलिसांना त्याबाबतची माहिती दिल्यानंतर ही घटना समोर आली.जयेश पटेल (३४), भूमिका पटेल (३०), आणि नक्ष पटेल (४) अशी तिघांची नावे आहेत. जयेश हे मूळचे गुजरात येथील अहमदाबादचे आहेत. बाणेर पाषाण लिंक रस्त्यावर बसंत बिहार सोसायटीमध्ये दुसºया मजल्यावर त्यांनी ८० लाख रूपयांचा फ्लॅट घेतला आहे. येरवडा भागातील एका आयटी कंपनीत नोकरीला होते, त्यांना महिना दीड लाख रुपये वेतन होते. त्यांचा चार वर्षांचा मुलगा नक्ष याच्या अर्ध्या शरीराची वाढ होत नव्हती. त्यामुळे तो सतत आजारी पडायचा, त्याला फिटचाही त्रास होता. त्याचा आजार बरा व्हावा यासाठी मोठा खर्चही केला होता.मंगळवारी नक्षला फिटचा त्रास झाल्यानंतर आईनेने त्याला रूग्णालयात नेले. त्यानंतर बुधवार आणि गुरूवारी जयेश कंपनीत गेले नाहीत. दोन दिवस त्यांच्या फ्लॅटचे दारही उघडले नव्हते. ते बाहेरगावी गेले असावेत, असेशेजाºयांना वाटत होते. दरम्यान, जयेशने आॅफिसमध्ये पूर्वसूचना न देता दोन दिवसांपासून सुटी घेतल्याने त्यांना आॅफीसमधील सहकाºयांनी फोन केला. परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी घरी येऊन पोलिसांच्या मदतीने दार तोडले. त्यावेळी तिघांचे मृतदेह दिसून आले.जयेशने त्याच्या पत्नीचा आणि मुलाचा खून करून स्वत: आत्महत्या केली असावी, अशी शंका होती. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीमध्ये जयेश पटेल आणि त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली असून, नक्षचा मृत्यू घातपाताने झाला नसल्याचे स्पष्ट झाले. शवविच्छेदनाचा व्हिसेरा राखून ठेवल्याने नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. नक्षला फिट येऊन त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे, त्याचा धक्का सहन न झाल्याने दोघांनीआत्महत्या केली असावी, असे परिमंडळ तीनचे उपायुक्त गणेश शिंदे यांनी सांगितले.