शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मॉरिशसच्या मराठी बांधवांची जेजुरीत पूजा, १८६४ साली विदेशात स्थायिक झालेल्या परिवारांच्या कुटुंबीयांची आस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 02:30 IST

सन १८६४ मध्ये सातारा जिल्ह्यातून बोटीवर खलाशी म्हणून गेलेल्या आणि मॉरिशस येथेच स्थायिक झालेल्या लक्ष्मण भोसले व गायकवाड, परब या परिवाराची पाचवी पिढी भारतात येऊन राज्यातील धार्मिक तीर्थस्थळे मंदिरे यांना भेटी देत धार्मिक विधी करीत आहे.

जेजुरी - सन १८६४ मध्ये सातारा जिल्ह्यातून बोटीवर खलाशी म्हणून गेलेल्या आणि मॉरिशस येथेच स्थायिक झालेल्या लक्ष्मण भोसले व गायकवाड, परब या परिवाराची पाचवी पिढी भारतात येऊन राज्यातील धार्मिक तीर्थस्थळे मंदिरे यांना भेटी देत धार्मिक विधी करीत आहे. या परिवारातील सुमारे ३० सदस्य जेजुरीत खंडेरायाच्या देवदर्शनासाठी आले असून शनिवारी (दि .७) ते स्वत: खंडेरायाचा जागरण गोंधळ, तळी-भंडार, लंगर तोडणे, खंडोबाची देवीची गाणी, जात्यावरची गाणी भारुड सादर करीत मॉरिशस मध्येही जोपासलेल्या मराठी परंपरा व धार्मिक संस्कृतीचे दर्शन घडवणार आहेत.ही कुटुंबे मॉरिशस येथे स्थायिक झाली. त्यावेळी त्यांचेकडे कुलदैवत खंडेरायासह तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरच्या अंबाबाईचे टाक होते. उदरनिर्वाह करताना गाव, देश सोडला असला तरी या परिवारांनी आपली धार्मिक मराठी परंपरा सोडली नाही. कुलदैवतांचे सण, उत्सव मोठ्या श्रद्धेने तेथे केले जात असत हीच परंपरा पाचव्या पिढीने म्हणजेच अनिल भोसले-लक्ष्मण, त्यांची पत्नी मीनाक्षी भोसले लक्ष्मण, वृशांत म्हाडकर-गायकवाड, मल्हारी आबाजी परब, जयश्री रामा आबाजी परब, प्रशिक शिकानंद हिरू पवार, मनीषा हिरू राघू पवार, राजेंद्र कुमार पडूं पंढरकर, हिराबाई लखना आदींनी जोपासली आहे. या परिवारातील ३० सदस्य भारतात आलेले असून तुळजापूर, कोल्हापूर, नेवासा चांदनपूर, व खंडोबाच्या ११ स्थळांना भेटी देत आहेत. सध्या त्यांचा निवास जेजुरीत आहे.सुमारे १५० वर्षांपूर्वी मराठा समाजातील आमचे पूर्वज मॉरिशस येथे स्थायिक झाले. त्यांनी येथील धार्मिक विधी, सण उत्सवांची परंपरा जोपासली होती. तोच वारसा आम्ही पुढे चालवत आहोत. मॉरिशसची लोकसंख्या १२ लाख असून सुमारे ३० हजार मराठी परिवार तेथे स्थायिक झालेले आहेत.जात्यावरच्या ओव्यांपासून विधींना सुरुवात होते. जागरण-गोंधळ, पारंपरिक गीते व लंगर तोडणे, तळी भंडार विधी केले जातात. देवाची भूपाळी, आरत्या, लोकगीते, अभंग या परिवाराला मुखोदगत आहेत. जेजुरीप्रमाणेच चंपाषष्ठी उत्सव सहा दिवस साजरा होतो. इटली व इंग्लंड मध्येही काही सदस्य स्थायिक आहेत. त्या ठिकाणी फक्त गोंधळ साजरा केला जातो, मॉरिशसमध्ये फ्रेंच आणि आफ्रिका मिळून क्रिओल भाषा बोलली जात असली तरी मराठी बांधव शुद्ध मराठीतून बोलतात. तेथील शाळेत ५० मिनिटांचा मराठीचा तास घेतला जात असून त्यामध्ये महापुरुषांचा इतिहास, मराठी देवदेवता, सण, उत्सवांचे महत्व आदी शिकवले जातात, अशी माहिती तेथील मराठीच्या शिक्षिका हिराबाई लखना यांनी दिली. भोसले यांच्या मॉरिशस येथील जगदंबे निवास या ठिकाणी खंडोबा व तुळजाभवानी मंदिर आहे. सध्या सर्व सदस्य भारतात आलेले असून कुलदैवतांच्या स्थळांना भेटी देत आहेत.श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त मंडळाकडून मॉरिशसवासीय मराठी परिवाराची भेट घेत त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच शनिवारी (दि.७) त्यांचे हस्ते पहाटेची भूपाळी, आरती करण्यात येणार आहे. सायंकाळी या परिवारातील सदस्य जयमल्हार सांस्कृतिक भवनमध्ये जात्यावरची ओवी, जागरण गोंधळ, तळीभंडार देवीच्या आरत्या आदी विधीतून लोक कलेचेव धार्मिक परंपरेचे दर्शन घडवणार आहेत. विदेशात राहूनही आपली संस्कृती जतन केल्याबद्दल या कुटुंबीयांचे विशेष कौतुक होत आहे. देवसंस्थानकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.विधीवत साजरे केले जातात सर्व सणआम्ही आषाढी कार्तिकी एकादशी, गणपती उत्सव, महाशिवरात्री या उत्सवांसह खंडोबाचे सोमवती अमावस्या, पौष, माघ, चैत्रपौर्णिमा, चंपाषष्ठी उत्सव साजरे करतो. गारमेंट (कापड दुकान) असलेले अनिल भोसले व त्यांची पत्नी मीनाक्षी जेजुरी प्रमाणेच खंडोबाचे वर्षातील उत्सव धार्मिक विधी साजरे करताना वाघ्या-मुरुळी म्हणून कार्य करतात. उच्चपदस्थ अधिकारी असलेले वृशांत पंढरकर हे सुद्धा देवाचा वाघ्या बनतात, जागरण गोंधळ करताना देवाला लागणारी हळद (भंडारा)जात्यावर दळली जाते.

टॅग्स :marathiमराठीJejuriजेजुरीPuneपुणे