शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामोन्नती मंडळाच्या महाविद्यालयातील पराक्रमपर्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:24 IST

जीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. रसूल जमादार यांनी सर्जिकल स्ट्राइक याविषयी प्रोजेक्टरवर मार्गदर्शन करत असताना भारतीय सैन्य किती बलशाली आहे हे सांगितले.

नारायणगाव : ग्रामोन्नती मंडळाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात पराक्रमपर्व - सर्जिकल स्ट्राइक दिवस महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या एनसीसी प्रमुख मा. लेफ्टनंट डॉ. दिलीप शिवणे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात पराक्रमपर्व- सर्जिकल स्ट्राइक दिवस साजरा करण्यात आला. या वेळी इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. उत्तम पठारे यांनी युद्धाचा इतिहास याविषयी माहिती देत असताना झेलमचे युद्ध, पानिपत युद्ध, पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध याविषयी व शिवाजी महाराजांची युद्धनीती कशी होती आणि त्यांनी सैन्यदल कसे तयार केले हे सांगितले.

जीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. रसूल जमादार यांनी सर्जिकल स्ट्राइक याविषयी प्रोजेक्टरवर मार्गदर्शन करत असताना भारतीय सैन्य किती बलशाली आहे हे सांगितले. यामध्ये आजपर्यंत झालेल्या सर्जिकल स्ट्राइक याविषयी माहिती दिली. पोस्टर सादरीकरण उपक्रम ३६ महाराष्ट्र बटालियनकडून आयोजित करण्यात आला होता. याला छात्रांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या प्रसंगी ५२ पोस्टर तयार करण्यात आले. यामध्ये विविध विषय म्हणजे एल.एम.जी. रायफल, इन्सास रायफल, एसएलआर रायफल, प्रिझम्याटिक कंपास, आर्मी पोस्ट्स, एनसीसी निदेशालय यांसारख्या विषयांवर पोस्टर करण्यात आले. यातून सर्व कॅडेट्सचा गुणगौरव ३६ महाबटालियनकडून करण्यात आला. या सर्व कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत शेवाळे, उपप्राचार्य होले, क्रीडाप्रमुख प्रा. गिरीश ढमाले, तसेच प्रा. शिरीष पिंगळे, प्रा. अनिल काळे, प्रा. गोविंद रसाळ आणि शिक्षकेतर वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमास राष्ट्रीय छात्रसेनेचे १०० कॅडेट्स उपस्थित होते. ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिल मेहेर, कार्यवाह रवींद्र पारगावकर यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन लक्ष्मी जाधव, तसेच कांबळे यांनी आभार मानले.

टॅग्स :Puneपुणे