पुणे : आशिया व पॅसिफिक भागातील खंडातील जॉर्इंट रिप्लेसमेंट सर्जन्सची सर्वांत मोठी संघटना असलेल्या ‘द एशिया-पॅसिफिक आॅर्थोप्लास्टी सोसायटी’च्या (एपीएएस) अध्यक्षपदी पुण्यातील ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. पराग संचेती यांची निवड करण्यात आली आहे.नवी दिल्ली येथे झालेल्या सोसायटीच्या १६व्या वार्षिक वैज्ञानिक बैठकीत डॉ. संचेती यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची घोषणा सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष डॉ. रामी सोरीअल (आॅस्ट्रेलिया) यांनी केली. आशिया व पॅसिफिक भागातील जॉर्इंट रिप्लेसमेंट सर्जन्सच्या विकासासाठी, त्यांना विविध फेलोशिप मिळवून देण्यासाठी, कार्यशाळा आयोजित करण्यासाठी एपीएएस पुढील काळात अधिक जोमाने कार्य करेल, असे डॉ. संचेती यांनी या बैठकीत सांगितले. मलेशियामध्ये होणाऱ्या सोसायटीच्या पुढील बैठकीमध्ये डॉ. संचेती अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील.भारतात गेल्या ५ वर्षांत जॉइंट रिप्लेसमेंटच्या शस्त्रक्रियांमध्ये वाढ झाली आहे. भारतात दरवर्षी गुडघे प्रत्यारोपणाच्या १ लाख १० हजारांहून अधिक शस्त्रक्रिया होत आहेत, असे डॉ. संचेती यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘एपीएएस’च्या अध्यक्षपदी पराग संचेती यांची निवड
By admin | Updated: September 30, 2015 00:59 IST