शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘पॅनकार्ड क्लब’ गुंतवणूकदारांना मिळणार दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 06:51 IST

सेबीने ९ मे २०१८ साठी पॅनकार्ड क्लब कंपनीच्या सुमारे २४ मिळकतींच्या आॅनलाइन लिलाव प्रक्रियेची जाहिरात दिली आहे.

धनकवडी : पॅनकार्ड क्लब कंपनीमध्ये गुंतवणूक करून फसवणूक झालेल्या देशभरातील गुंतवणूकदारांना जून, जुलै २०१८मध्ये परतावा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशी माहिती गुंतवणूकदारांचे पैसे मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या धनकवडीतील राष्टÑशक्ती संस्थेतर्फे देण्यात आली.देशभरातील पॅनकार्ड क्लब कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी लढणाºया धनकवडी येथील राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को-आॅर्डिनेशन कमिटीच्या शिष्टमंडळाची नुकतीच मुंबई येथील सेबीच्या मुख्यालयात सेबीच्या अधिकाºयांसोबत बैठक झाली. सेबीने ९ मे २०१८ साठी पॅनकार्ड क्लब कंपनीच्या सुमारे २४ मिळकतींच्या आॅनलाइन लिलाव प्रक्रियेची जाहिरात दिली आहे. त्यामध्ये मिळकतींच्या किंमती ६० ते ७० टक्क्यांनी कमी करण्यात आल्याने गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर, राष्ट्रशक्तीची सेबीचे मुख्य वसुली अधिकारी डी. व्ही. शेखर व तांडवा कृष्णा यांच्यासोबत बैठक झाली. या वेळी संघटनेने अनेक प्रश्नांचा खुलासा सेबीकडे मागितला. सेबीकडे गुंतवणूकदारांच्या आलेल्या माहितीची छाननी पूर्ण केली असून, देशभरात फसलेल्या एकूण ५१ लाख गुंतवणूकदारांपैकी केवळ २५ लाख गुंतवणूकदार हे छोटे गुंतवणूकदार आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या लिलाव प्रक्रियेतून केवळ ३०० कोटी मिळाले, तरी त्यातून २५ लाख गुंतवणूकदारांचा परतावा जाऊ शकतो, अशी माहिती मुख्य वसुली अधिकारी डी. व्ही. शेखर यांनी राष्ट्रशक्तीच्या शिष्टमंडळाला दिली. राष्ट्रशक्तीने गेल्या दोन वर्षांत उभारलेल्या लढ्याला आता यश येताना दिसत आहे. पुढच्या २ ते ३ महिन्यांत २५ लाख गुंतवणूकदारांना परतावा मिळेल अशी आशा आहे, असे राष्ट्रशक्ती संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर यांनी सांगितले.

टॅग्स :fraudधोकेबाजी