शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

पालखी प्रस्थान होणार जुन्याच मार्गाने

By admin | Updated: July 20, 2015 03:56 IST

प्रशासनाने केलेली तयारी, अधिकारीवर्गाने केलेल्या शिष्टाईला मान देऊन संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान जुन्याच मार्गाने ठेवण्याचा

इंदापूर : प्रशासनाने केलेली तयारी, अधिकारीवर्गाने केलेल्या शिष्टाईला मान देऊन संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान जुन्याच मार्गाने ठेवण्याचा निर्णय पालखीप्रमुखांनी घेतला, अशी माहिती ‘लोकमत’शी बोलताना उपनगराध्यक्ष भरत शहा, गटविकास अधिकारी डॉ. लहू वडापुरे यांनी दिली.बारामतीचे प्रांताधिकारी संतोष जाधव, विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, तहसीलदार सूर्यकांत येवले, गटविकास अधिकारी डॉ. लहू वडापुरे, पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांच्या शिष्टमंडळाने आज (दि. १९) सायंकाळी निमगाव केतकी येथे जाऊन पालखीप्रमुखांची भेट घेतली. प्रस्थानाच्या रस्त्याच्या दुरुस्ती, स्वच्छतेच्या कामाची माहिती दिली. त्या रस्त्यावर पालखीच्या प्रस्थानाच्या वेळी फुले अंथरण्यात येणार आहेत. सुवासिक अत्तराची फवारणी करण्यात येणार आहे. कडेने झालर बसविण्यात येणार आहे. याचीही माहिती पालखीप्रमुखांना देण्यात आली. प्रस्थानाचा जुना मार्ग बदलू नये, अशी विनंती अधिकारीवर्गाच्या शिष्टमंडळाने केली. त्या विनंतीस मान देऊन प्रस्थानाचा जुना मार्ग कायम ठेवण्याचा निर्णय पालखीप्रमुखांनी घेतला. पुढच्या वर्षी परिस्थितीनुरूप निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान,आजच्या ‘लोकमत’मध्ये ‘पालखी नव्या मार्गाने नेण्यामध्ये पेच’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताने खळबळ उडाली. पालखीच्या प्रस्थानाच्या मार्गावरून प्रस्थान करण्यास पालखीप्रमुखांनी नकार दिला होता. त्यामुळे भाविक नाराज होते. याच मुद्द्यावर पालखीप्रमुखांशी चर्चा केली. पालखी प्रस्थान पूर्वीच्या मार्गाने व्हावे. शेकडो वर्षांच्या परंपरेला छेद देऊ नये, पालखीप्रमुखांनी अट्टहासाचे धोरण सोडावे, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. यावर पालखीप्रमुखांनी आम्ही रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी मुक्काम करून तेथूनच प्रस्थान करू. पुढच्या वर्षी निमगाव केतकी येथून सराटी मुक्कामाकडे जाऊ, अशी हेकट भूमिका स्वीकारल्यानंतर वादावादीला सुरुवात झाली. पालखीप्रमुख आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास नाईलाजास्तव आम्हाला नेहरू चौकामध्ये आंदोलन करावे लागेल. अनुचित प्रकार घडल्यास त्यास पालखीप्रमुख जबाबदार राहतील, असा निर्वाणीचा इशारा शिष्टमंडळाने दिला. (वार्ताहर)