शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलचोरी ५ हजारांत शुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 06:19 IST

वैधमापनशास्त्र विभागाच्या नियमानुसार पेट्रोलचोरी करणारा पंपचालक आणि पेट्रोल वितरण यंत्राची तपासणी करून न घेणारा असे दोघेही केवळ २ ते ५ हजार रुपयांच्या दंडाचे धनी आहेत.

विशाल शिर्केपुणे : वैधमापनशास्त्र विभागाच्या नियमानुसार पेट्रोलचोरी करणारा पंपचालक आणि पेट्रोल वितरण यंत्राची तपासणी करून न घेणारा असे दोघेही केवळ २ ते ५ हजार रुपयांच्या दंडाचे धनी आहेत. त्यामुळे चोरही दंड भरुन शुद्ध होत असल्याचे चित्र निर्माण झाले असून, किरकोळ दंडामुळे पेट्रोल - डिझेल यंत्रणेची तपासणी करून घेण्यातही दिरंगाई केली जात असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.देशासह राज्यात विविध ठिकाणी पेट्रोल पंपावर इलेक्ट्रॉनिक चिपच्या माध्यमातून पेट्रोल-डिझेल चोरी होत असल्याच्या घटना नुकत्याच उघडकीस आल्या आहेत. राज्याच्या वजनमापे विभागाच्या माध्यमातून या पंपातील यंत्र प्रमाणित केले जाते. तसेच, वजनमापे विभागाला पेट्रोलपंपावर तपासणी करण्याचे देखील अधिकार आहेत. मात्र, वैधमापन शास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात २०१३ पासून केवळ एकाच पंपावर पेट्रोल कमी प्रमाणात दिले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ११४ पंपचालकांनी वेळेत पेट्रोल पंपांच्या यंत्राची वैधमापन विभागाकडून तपासणी केली नसल्याची माहिती समोर आले आहे. माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते अझहर खान यांनी माहिती अधिकारात ही बाब उघड केली आहे. पेट्रोल पंपांच्या पुढे भाजी विक्रेते आणि आठवडी बाजारातील विक्रेते सर्वाधिक प्रमाणात वजनमापांचे प्रमाणीकरण करीत नसल्याचे आकडेवारी सांगते. पेट्रोलच्या चोरीचे प्रकरण असो, की मिठाई आणि भाजीपाल्याच्या वजनातील चोरी, अशा बाबी या दंडावरच निभावण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त हा दंड ५ हजार रुपये असल्याने मापातील पाप करणाºयांवर वचक बसत नसल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.कमी प्रमाणात वस्तूंचे वितरण केल्यास जास्तीत जास्त ५ हजार रुपये दंडाची शिक्षा आहे. एखाद्या व्यक्तीने दंड न भरल्यास त्याच्यावर खटला दाखल केला जातो. वजन-मापांचे प्रमाणीकरण न केल्यास, पॅकेज वस्तूंवर संबंधित कंपनीचा नाव पत्ता नसेल, पॅकेज कधी केले याचा उल्लेख नसल्यास संबंधितांवर कारवाई केली जाते. अशा प्रकरणांत २ हजार रुपयांचा दंड आकारला जातो.- ध. ल. कोवे, उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र, पुणे विभाग