शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गाण्याच्या वादावरून पबमध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 01:56 IST

डीजेने टोळीप्रमुखाच्या आवडीचे गाणे लावावे, म्हणून दोन टोळीच्या सदस्यांमध्ये बाचाबाची व तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुणे : डीजेने टोळीप्रमुखाच्या आवडीचे गाणे लावावे, म्हणून दोन टोळीच्या सदस्यांमध्ये बाचाबाची व तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी गोळीबार झाल्याचीही चर्चा पबमध्ये होती. पोलिसांकडे तक्रारही आली होती. मात्र, तपासानंतर पोलिसांनी असे काही घडलेच नाही, असे सांगितले.मुंढवा येथील एफ-बीच नावाने प्रसिद्ध ‘हॉटेल केवायके’ या पबमध्ये शनिवारी मध्यरात्री दोन वाजता हा प्रकार घडला. दरम्यान, टोळीतील वादानंतर या ठिकाणी गोळीबार झाला असल्याचे मुंढवा पोलिसांना फोनद्वारे कळविण्यात आले होते. मात्र पोलीस प्रत्यक्ष गेले असता, असा प्रकार झाला नसल्याचे मुंढवा पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र गोळीबार झाल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू होती. दोन्ही टोळींचे प्रमुख शहरातील दिग्गजांचे निकटवर्तीय असल्याने हे प्रकरण दाबण्यात आल्याचे समजते. मुंढवा येथील केवायके पबमध्ये शुक्रवारी लेडिज नाईट असते. लेडिज नाईटच्या दिवशी तरुणींना पबमध्ये मोफत एंट्री दिली जाते. त्यामुळे या दिवशी पबमध्ये मोठी गर्दी असते. शुक्रवारी (१५ जून) शहरातील दोन मोठ्या टोळीचे प्रमुखही पबमध्ये आले होते. त्यातील एकाच्या फर्माईशवरून डीजेने हिअर दी साँग फॉर मिस्टर... असे म्हणत नाव पुकारले. त्यामुळे दुसऱ्या टोळीच्या प्रमुखाला राग आल्याने दोन्ही प्रमुखांची बाचाबाची व धक्काबुक्की झाली होती. त्यातूनच चिडलेल्या एकाने दहशत निर्माण करण्यासाठी पिस्तुलमधून हवेत तीन-चार राऊंड फायर केले. अचानक गोळीबार झाल्याने पबमध्ये गाण्यावर थिरकत असलेल्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली, तर काहींनी पबमधून पळ काढला. वाद मिटण्यापूर्वी एका गटाने पबमध्ये धिंगाणा घालत मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची चर्चा रंगत आहे.तसेच ज्या टोळीप्रमुखाला घाबरविण्यासाठी गोळीबार करण्यात आला त्याने पोलीस नियंत्रण कक्षात फोन करून गोळीबार झाल्याची माहिती दिली. मात्र दोन्ही टोळीप्रमुखांचा शहरातील काही बड्या व्यक्तींशी संबंध असल्याने मध्यस्थी करून पहाटेपर्यंत वाद मिटवत प्रकरण रफादफा करण्यात आले. गोळीबार झाल्याचे कळविणाºया टोळीप्रमुखाने पोलीस ठाण्यात जाऊन फक्त बाचाबाची झाल्याची तक्रार नोंदविल्याचे कळते.>गोळीबार झाला नाही!दरम्यान, याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पात्रुडकर यांनी सांगितले, की पोलीस नियंत्रण कक्षाला गोळीबार झाल्याचा फोन आल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मात्र गोळीबाराचा कोणताही प्रकार घडला नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. केवळ दुसºयाला त्रास देण्यासाठी खोटा फोन केल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती दिली, म्हणून राजेश चव्हाण याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणे