शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजनचं संकट दूर करण्यासाठी हवाई दल मदतीला आले; ४ टँकरसह पुण्याहून गुजरातकडे रवाना झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 23:49 IST

जाताना हवाई मार्गे तर येताना 'बाय रोड' 

पुणे : मागील दोन आठवड्यांपासून पुण्यात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडू लागला आहे. प्रशासनाच्या प्रयत्नानंतरही हा पुरवठा सुरळीत झालेला नाही. ऑक्सिजनची ही कमतरता भरून काढण्याकरिता थेट भारतीय हवाई दलाच्या मदतीचा हात पुढे केला आहे. हवाई दलाच्या विमानाने ऑक्सिजनचे चार रिकामे टँकर गुजरातमधील जामनगर येथे रवाना झाले. या टँकरमधून पुण्यासाठी ऑक्सिजन आणला जाणार असल्याची माहिती संरक्षण विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. 

देशभरातच लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. हा तुटवडा कमी करण्यासाठी हवाई दल प्रयत्न करीत आहे. ऑक्सिजन आणण्यासाठी रेल्वेचीही मदत घेण्यात येत आहे. परंतु, रस्ते आणि लोहमार्गाने ऑक्सिजन पोचण्यास उशीर लागत आहे. त्यामुळे हवाई दलाने मदतीचा हात पुढे केला आहे. कमी वेळात ऑक्सिजन पुरविण्यासाठी विमानाने वाहतुकीचा प्रयत्न केला जात आहे. हवाई दलाचे सी-१७ विमान शनिवारी सकाळी दहा वाजता उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील हिंडन विमानतळावरून पुण्यात दाखल झाले. या विमानात दोन रिकामे क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर चढविण्यात आले. पुणे विमानतळावरून हे विमान जामनगरला रवाना झाले. हे दोन टँकर जामनगरला पोचवून हे विमान पुन्हा पुण्यात आले. दुसरी फेरी करून आणखी दोन ऑक्सिजन टँकर जामनगरला पोहोचविण्यात आले.-----लडाखच्या दुर्गम भागात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने विकसित केले साहित्य हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टर आणि एएन ३२ मालवाहतूक विमानातून पोचविण्यात आले. जम्मूमधून लेह आणि कारगिलसाठी बायो सेफ्टी कॅबिनेट्स, सेंट्रिफ्युजेस आणि स्टॅबिलायजर्स असे कोरोना चाचणीचे साहित्य पोहोचविण्यात आले. यासोबतच हवाई दलाच्या सी-१७ विमानाने पहाटे दोन वाजता हिंडन विमानतळावरून सिंगापूरच्या चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चार ऑक्सिजन कंटेनर आणण्यात आले. हे कंटेनर पश्चिम बंगालमधील पानागढ हवाई तळावर उतरविण्यात आले.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याGujaratगुजरातindian air forceभारतीय हवाई दल