शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

Coronavirus Pune रुग्णसंख्या घटल्याने पुण्यात सकारात्मक चित्र ; जंबो मधील ३०० बेड्स केले कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 12:58 IST

ऑक्सिजन बेड ची मागणी घटली:अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांची माहिती

 कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत वरदान ठरलेल्या जम्बो कोविड रुग्णालयातील रुग्ण आता कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे रुग्णालयातील ३०० ऑक्सिजन खाटा कमी करण्यात आल्या आहेत. दुसऱ्या लाटेत जम्बो पुन्हा सुरू करण्यात आल्यानंतर त्याची क्षमता ७०० रुग्णांवर नेण्यात आली. दुसऱ्या लाटेमध्येही हजारो रुग्णांना या रुग्णालयाचा मोठा फायदा झाला. पुण्यात रुग्ण कमी होत असून सकारात्मक चित्र निर्माण होत असल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले.  

मागील दोन आठवड्यांपासून रुग्णसंख्या झपाट्याने खाली गेली आहे. शहराचा पॉझिटिव्हीटी रेटही साडेसात टक्क्यांवर आला आहे. रुग्णसंख्या घटत चालली असून ऑक्सिजनवरील रूग्णांची संख्याही कमी होऊ लागली आहे. त्यामुळे ऑक्सिजन बेडची मागणी कमी झाली आहे. एकूण ७०० कार्यान्वित खाटांपैकी ५०० खाटा ऑक्सिजनच्या आहेत. यातील ३०० खाटा कमी करण्यात आल्या आहेत. तर, २०० ऑक्सिजन खाटा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. यासोबतच एचडीयुच्या १४० खाटा, आयसीयू आणि व्हेंटिलेटरच्या ६० खाटा कार्यान्वित ठेवण्यात आलेल्या आहेत. 

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. शहरातील वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत अत्यवस्थ रूग्णांची संख्या सुद्धा वाढत गेली. खासगी रुग्णालयांमध्ये खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या. नागरिकांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत याकरिता जम्बो रुग्णालय पुन्हा सुरू करण्यात आले. जम्बो रुग्णालय १५ जानेवारी रोजी बंद करण्यात आले होते. त्यानंतर ते पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. २२ मार्चपासून रुग्णालय सुरू करण्यात आल्यानंतर येथील रुग्णसंख्या टप्प्याटप्प्याने ७०० वर नेण्यात आली होती.

----

जम्बो रुग्णालयाची सद्यःस्थिती 

एकूण क्षमता - ८००

सक्रिय खाटा - ७००

ऑक्सिजन खाटा - ५००

(यापैकी ३०० कमी केल्या)

आयसीयू, व्हेंटिलेटर, एचडीयू - २००

सध्या कार्यान्वित - ४००

----

जम्बो कोविड सेंटरमधील ऑक्सिजन खाटांची मागणी कमी झाली आहे. त्यानुसार जम्बोमधील ३०० खाटा कमी करण्यात आल्या आहेत. एचडीयु, आयसीयू आणि व्हेंटिलेटरवरील रुग्ण कमी झालेले नाहीत. या २०० खाटा आणि ऑक्सिजनच्या २०० खाटा सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत. रुग्णसंख्या कमी होत असल्याने शहरात सकारात्मक चित्र निर्माण होत आहे.

- रुबल अगरवाल, अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस