शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

रब्बी पिकांसाठी १८ लाखांहून अधिक अर्ज; ठाणे, पालघर जिल्ह्यातून अर्ज नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 09:46 IST

रब्बी हंगामातील पिकांसाठीही एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिला आहे. पीक विमा काढण्यासाठी १५ डिसेंबरची अंतिम मुदत असून, राज्यात आतापर्यंत १८ लाख ७९ हजार ८२२ अर्ज आले आहेत.

पुणे : रब्बी हंगामातील पिकांसाठीही एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिला आहे. पीक विमा काढण्यासाठी १५ डिसेंबरची अंतिम मुदत असून, राज्यात आतापर्यंत १८ लाख ७९ हजार ८२२ अर्ज आले आहेत. यातून १३ लाख ३७ हजार ३३६ हेक्टरवरील पिकांचे क्षेत्र तर सुमारे साडेपाच हजार कोटींची रक्कम विमा संरक्षित झाली आहे.

 परभणी जिल्ह्यातून सर्वाधिक २ लाख ७४ हजार अर्ज आले आहेत. पुणे विभागातून २ लाख ४२ हजार ५९७ तर ठाणे व पालघर जिल्ह्यातून एकही अर्ज आला नसल्याचे कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

शेतकऱ्यांना ज्वारी, गहू, हरभरा, रब्बी कांदा या पिकांसाठी १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतील. तसेच उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या पिकासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. यंदा अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बी पिकांवर आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विमा संरक्षित क्षेत्रात किमान १० टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.

ठाणे व पालघर जिल्ह्यातून एकही अर्ज अद्याप आलेला नाही. रायगडमधून एक, रत्नागिरीमधून पाच तर सिंधुदुर्गमधून सहा अर्ज आले आहेत.

विभागनिहाय अर्जांची संख्या

कोकण  १२

नाशिक  १,२२,७७६

पुणे    २,४२,५९७

कोल्हापूर ५३,४०४

छ. संभाजीनगर  ४,४५,९०३

लातूर   ७,२२,१७९

अमरावती       २,५८,७०६

नागपूर  ३४,२४५

एकूण   १८,७९,८२२

लातूरमधून सर्वाधिक

लातूर विभागातून सर्वाधिक ७ लाख २२ हजार ११९ अर्ज आले आहेत.

एकूण अर्जांमुळे राज्याला ३६ कोटी तर केंद्र सरकारला २१८ कोटी रुपयांचा प्रीमियम विमा कंपन्यांना द्यावा लागणार आहे.

राज्यात गेल्यावर्षी रब्बी हंगामात एकूण ७१ लाख ८७ हजार १८२ अर्ज आले होते.