शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मैदानी खेळ होताहेत नामशेष, मैदाने उपलब्ध होणे झाले कठीण, मुले मोबाइलच्या आहारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 02:08 IST

रावेत : उपनगरातील अपार्टमेंट व बंगल्यांच्या वाढत्या संख्येमुळे खेळासाठी पुरेशी मैदाने उपलब्ध होणे कठीण झाले आहे. जी मैदाने उपलब्ध आहेत त्यांना बकाल अवस्था प्राप्त झाली आहे.

रावेत : उपनगरातील अपार्टमेंट व बंगल्यांच्या वाढत्या संख्येमुळे खेळासाठी पुरेशी मैदाने उपलब्ध होणे कठीण झाले आहे. जी मैदाने उपलब्ध आहेत त्यांना बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. यामुळे घरासमोरील रस्तेच चिमुकल्यांसाठी खेळपट्टी झाले आहे. मुलांना आपल्या आवडी आता घरातच शोधत बसावे लागत आहे. मैदाने नसल्याने मोबाइलवरील गेम खेळण्यास मुले प्राधान्य देत आहेत.शहरात खेळण्यासाठी मैदानेच नसल्याने नाईलाजाने मुलांना क्रिकेट असो वा फुटबॉल हे मैदानी खेळ रस्त्यावरच खेळावे लागत आहेत. रस्त्यावर अपघात होतात म्हणून अनेक जणांना इच्छेला मुरड देत सक्तीने कॉम्प्युटर गेम खेळतात. मातीमध्ये खेळताना पडणे, खरचटणे, त्यातून शिकण्याचा अनुभव मिळणे आता विरळच़ त्यामुळे इमारतीच्या बाहेरील रस्त्यांवरील दुपारी किंवा रात्री वाहनांची गर्दी कमी असली की, खेळायचे असा चिमुकल्यांचा सुटीतील दिनक्रम बनू लागला आहे.>दुपारच्या वेळी रणरणत्या उन्हात घराबाहेर पडण्यापेक्षा पालक मुलांना बैठे खेळ खेळायला सांगतात. सध्या चिमुकल्यांना बैठे खेळांमध्ये सर्वात जास्त बुद्धिबळ आणि कॅरम खेळायला आवडते. सापशिडी काहीप्रमाणात हरवत असून त्याची जागा वैज्ञानिक आणि बौद्धिक खेळांनी घेतल्याचे दिसून आले आहे. मैदानावर जाऊन मातीत खेळणे, रस्त्यावर किंवा बागेत जाऊन धिंगाणा घालण्यापेक्षा घरात बसून कॉम्प्युटरवरील गेम्स खेळण्याकडे २५ टक्क्यांपेक्षा अधिक मुलांचा कल आहे. कॉम्प्युटर गेम्स येण्यापूर्वी व्हीडिओ गेम्स मोठ्या प्रमाणात खेळले जात होते. त्यामुळे डोळ्यांचे विकार होऊ लागले आहेत. त्यामुळे लहान मुलांना चष्मा हा फार कमी वयात लागतो हे प्रमाण ३0 टक्के आढळते. विद्यार्थ्यांचे डोळ्यांच्या आजाराने अभ्यासावरील लक्ष विचलित होत आहे.आयपीएलसारख्या स्पर्धेमुळे चिमुकल्यांचा कल मैदानी खेळ खेळण्याकडे वाढत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने, क्रिकेट, फुटबॉल तर इनडोअर गेम्समध्ये बॅडमिंटन आणि टेनिस खेळायची क्रेझ वाढली आहे. परंतु पुरेशी मैदाने नसल्याने त्यांच्या आवडीला वाव मिळेनासा झाला आहे.शहरात मैदानांची संख्या कमी झाल्याने मुलांचा मैदानात खेळण्याचा हक्क हिरावून घेतला जात आहे. नाईलाजाने कॉलनीच्या कोपºयात घरासमोरील रस्त्यावर मुलांना जीव धोक्यात घालून खेळावे लागत आहे. शहरात अजूनही बोटावर मोजता येतील एवढीच मोठी मैदाने तग धरून आहेत. त्यामुळे या ठिकाणी सर्वसामान्य मुलांना क्रिकेट किंवा इतर खेळ खेळण्यास द्यावे. काही मैदाने शहरात आहेत त्याचा महापालिकेने विकास करावा, अशी मागणी होत आहे.