शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
3
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
4
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
5
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
6
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
7
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
8
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
9
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
10
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
11
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
12
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
13
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
14
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
15
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
16
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
17
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
18
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
19
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
20
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय

वाल्हेत साथीचे आजारातने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:11 IST

वाल्हे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होत असताना, आता डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे उद्‌भवण्याची शक्‍यता नाकारता ...

वाल्हे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होत असताना, आता डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे उद्‌भवण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. डेंग्यूचा फैलाव कमी प्रमाणात असला तरी, कोरोनाशी लढा देताना नागरिकांना डेंग्यूपासून देखील काळजी घ्यावी लागणार आहे.

मागील पंधरा दिवसांत वाल्हे गावातील खाजगी रुग्णालयात सात

डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. अगोदरच करोनाचा समावेश झाला आहे. त्यातच कोरोना पाठोपाठ डेंग्यूचा ग्रामीण भागात प्रवेश झाला आहे त्यात कमी प्रमाणात का होईना आज ही कोरोना बाधितांची संख्या आढळून येत आहे.

पावसाची रिमझिम चालू असल्या मुळे

वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. हे वातावरण आरोग्यासाठी अपायकारक आहे. त्यामुळे व्हायरल इन्फेक्‍शनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

वातावरणातील बदल व पावसामुळे साचून राहिलेल्या पाण्याच्या मार्फत सर्वत्र मलेरिया, डेंग्यूच्या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे डेंग्यू व चिकुनगुनियाच्या साथीत वाढ होताना दिसून येत आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रभाव कमी होत असताना जुलै महिन्यातच डेंग्यू व चिकुणगुनिया साथीच्या आजारांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांच्यात भितिचे वातावरण तयार झाले आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आव्हान आरोग्य व वैद्यकीय विभागापुढे आहे.

वाल्हे ग्रामपंचायती अंतर्गत जवळपास सर्वच वाड्या वस्तीवरील अंतर्गत गटार योजनेचे कामे पुर्ण झाली आहेत. वाल्हे गावअंतर्गत शंभर टक्के अंतर्गत गटार योजना पुर्ण झाली असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी बबनराव चखाले यांनी दिली.

घर, परिसरात स्वच्छता ठेवाव गरज नसलेले निकामी टायर, नारळाच्या करवंट्या, घराच्या छतावरील भंगार साहित्य, फुलदानी, फ्रीज, कुलर्सच्या ट्रे मध्ये स्वच्छता ठेवावी. नागरिकांना स्वच्छता ठेवण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून केले जात आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. डेंग्यू व चिकुनगुणियाचे रुग्ण वाढत आहेत. ही बाब जरी खरी असली तरी नागरिकांनी घाबरून न जाता आजूबाजूचा परिसर व फ्रीजच्या पाठीमागे जमा होणारे पाणी काढून टाकावे असे आवाहन वाल्हे ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल खवले, उपसरपंच चंद्रशेखर दुर्गाडे, ग्रामविकास अधिकारी बबनराव चखाले आदींनी केले आहे.

--

चौकट

--

घराघराचे सर्वेक्षण

वाल्हे गावातील अडीचशे ते तीनशे घराचांचे सर्वेक्षण आशा स्वयंसेविकेच्या माध्यमातून मंगळवार पर्यंत पूर्ण करण्यात आला असून, वाल्हे ग्रामपंचायतीने परिसरात धुराडीची फवारणी केली असून, परिसरात पावसाने वाढलेल्या गवतावर तनाशक फवारणी केली आहे. तसेच ग्रामसुरक्षा यंञणेच्या माध्यमातून नागरिकांची जनजागृती केली जात आहे. अशी माहिती वाल्हे ग्रामपंचायत प्रशासनाकडून देण्यात आली.

--

चौकट

वाल्हे परिसरातील नागरिकांनी डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया आदी आजारांना घाबरून न जाता, संबंधित रूग्णाला आजाराची लक्षणे जाणवल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन संबंधित आजारांवरील उपचार घ्यावेत. वाल्हे गावात मागील पंधरा दिवसांपासून सात रूग्ण डेंग्यू आजाराचे आढळून आले आहेत. मात्र संबंधित रूग्ण हे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून, संबंधित रूग्णांनी

प्राथमिक आरोग्य केंद्राला याबाबत माहिती दिली नव्हती". अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत आंधळे, डॉ. आदित्य धारूडकर यांनी दिली.

--

फोटो २७ वाल्हे डेंग्यू सदृष्य आजार

फोटो ओळ : प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी वतिने आशा वर्कर च्या मदतीने घरोघरी जाऊन तपासनी करित आहेत.

--

फोटो ओळ : २ वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतिने गावतील गल्ली बोळात जाऊन धुराडी फवारनी करत आहेत.