शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आमचा ताण हलका होतोय, तुमचाही होईल : म्युनिकमधील मराठी जनांचा भारतीयांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 19:41 IST

सरकारी सुचना पाळण्याचे आवाहन

ठळक मुद्देआम्ही सुद्धा महत्वाचं काम असल्याशिवाय घराच्या बाहेर पडतच नाही आहोत

राजू इनामदार-  

पुणे : जर्मनीतील म्युनिकमध्ये गेले काही दिवस कोरोना दहशतीच्या वातावरणात असलेल्या मराठी बांधवांना इकडचीही काळजी वाटत होती. मात्र, आता हळुहळू त्यांचा ताण हलका होत असून तुमचाही ताण कमी होईल,असे त्यांचे भारतीयांंना सांगणे आहे.मात्र, त्यासाठी सरकारच्या सर्व सुचनांचे काटेकोर पालन.करा, त्या तुमच्या हितासाठीच आहेत असेही.आवाहन ते करत आहेत. म्युनिकमध्येही कोरोना विषाणूचा आजार दाखल झाला असून तेथील सरकारने लॉकडाऊन जाहीर करून तीन आठवडे झाले आहेत.मागील ५ वर्षांपासून म्युनिक मध्ये राहणार्या राजश्री पुराणिक 'लोकमत' बरोबर बोलताना म्हणाल्या, आमचे व पती उपेंद्र याचेही वर्क फॉर्म होमच सुरू आहे. मुलगा इशान याची शाळाही सध्या ऑनलाईन आहे. इथे लॉकडाऊन जाहीर होऊन आत्ता साधारण तीन आठवडे होतील. अजून दोन आठवडे लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्या झाल्या जी दहशत माझ्यासारख्या लोकांच्या मनात होती तिचं रूपांतर आता आशेत होतंय. आता एक आशा वाटती आहे की सगळं नक्कीच हळुहळू का होईना पूवीर्सारखं होईल. मनावर आलेला ताण हलका होतोय; त्याला कारण आजूबाजूचं वातावरण आणि जर्मनीची आरोग्ययंत्रणा उचलत असलेले योग्य पावलं आहेत.पुराणिक म्हणाल्या, नागरिकांना विश्वासात घेऊन इथे सर्व गोष्टी केल्या जात आहेत. दुसर्या बाजूने सांगायचे तर सरकारने ठरवून दिलेले नियम लोकही कसोशीने पाळत आहेत. जसं की दुकानाच्या रांगेत २ मीटरच्या अंतरावर उभे राहणे, कुठेही गर्दी न करणे, महत्वाच्या कामासाठीच घराबाहेर पडणे इत्यादी. त्यामुळेच अगदी सुरूवातीला आम्हाला आलेला ताण, वाटलेली भीती आता कमी झाली आहे. इथे अजिबात घबराटीचं वातावरण नाहीये. लोक शांत आहेत. जे सुरू आहे, आपल्यासाठीच हे आहे याची त्यांना खात्री आहे. काल माज्या जर्मन शेजारणीशी बोलले तर त्या म्हणाल्या त्यांना ही नवीन जीवनशैली खूप आवडली. जसं की सोशल डिस्टंसिंग, सगळी दुकानं बंद असणे, रस्त्यांवरची गर्दी कमी होणे. आमच्या आजूबाजूच्या इमारतींमधले लोकही अधूनमधून गॅलरीत येऊन एकमेकांना प्रोत्साहित करतात.

आम्ही सुद्धा महत्वाचं काम असल्याशिवाय घराच्या बाहेर पडतच नाही आहोत. भारतात व त्यातही पुण्यातली काळजी मात्र आहे असे पुराणिक म्हणाल्या. त्यांच्या बरोबर असणारे राहूल जोशी, केतकी जोशी, पराग वर्तक, सुप्रिया वर्तक यांच्याही नेमक्या याच भावना आहेत.आमचा ताण हलका झाला, तूमचाही नक्कीच होईल, मात्र सरकारच्या सर्व सुचनांचे काटेकोर पालन करा,लॉकडाऊनचे नियम पाळा आणि सुरक्षित रहा! असे आवाहन त्यांनी केले. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याGermanyजर्मनी