शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
5
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
6
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
7
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
8
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
9
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
10
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
11
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
12
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
13
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
14
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
15
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
16
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
17
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
18
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
19
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
20
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...

आमची जिंदगी ‘उपरवाले के भरोसे’!

By admin | Updated: December 8, 2015 00:17 IST

अच्छी तनखा हात में नही आती, फिरभी घर चलाने के लिए जान जोखीम में डालनी पडती है, हमारी रक्षा तो उपरवालेके हात में है, उसीके भरोसे जिंदगी गुजर रही है...

पुणे : अच्छी तनखा हात में नही आती, फिरभी घर चलाने के लिए जान जोखीम में डालनी पडती है, हमारी रक्षा तो उपरवालेके हात में है, उसीके भरोसे जिंदगी गुजर रही है... ही व्यथा आहे तुटपुंज्या पगारावर असुविधांशी लढणाऱ्या सुरक्षारक्षकांची. सुरक्षा इमारती, आस्थापने, कार्यालये, दुकाने, एटीएम सेंटर अशा ठिकाणी सुरक्षारक्षक नेमले जातात. या मालमत्तांच्या आणि स्वत:च्या सुरक्षेसाठी कोणतीही साधनसामग्री उपलब्ध नाही. सुरक्षा मंडळाचा (गार्ड बोर्ड) कायदा अस्तित्वात असूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले आहे. एखादी काठी आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या भरवशावर सगळी सुरक्षा व्यवस्था अवलंबून असल्याचेही यातून स्पष्ट झाले. घटना घडून गेल्यानंतर सीसीटीव्हीचा उपयोग होतो. अशा घटना घडूच नयेत, यासाठी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. कोणत्याही मालमत्तेची सुरक्षा नितांत गरजेची असते. त्यास हानी पोहोचू नये, यासाठी विविध प्रकारच्या सुरक्षा यंत्रणा राबविण्यात येतात. या यंत्रणेमध्ये रक्षकांची जबाबदारी महत्त्वाची मानली जाते. मालमत्तेचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने त्यांनी सदैव तत्पर राहणे गरजेचे असते. मात्र, एखादा हल्ला झालाच कोणतेही हत्यार नसल्याने प्रतिकार करणे अशक्य होते. घटना घडून गेल्यानंतर त्याची तक्रार जवळील पोलीस ठाण्यात नोंदविण्याच्या सूचना केलेल्या असतात. पण, हल्ला रोखण्यासाठी लागणारी यंत्रणा नसल्याने सुरक्षा धोक्यात येते. सोसायट्यांमध्ये केवळ २-३ सुरक्षारक्षक नेमलेले असतात. सोसायटीमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींची चोर अथवा अनोळखी व्यक्तींनी आत येण्याचा प्रयत्न केला तर त्यांना रोखण्यासाठी किंवा स्वत:च्या बचावासाठी त्यांच्याकडे काहीच नसल्याचे दिसून आले.सुरक्षा एजन्सीतर्फे रक्षकांना महिन्यातून दोनदा प्रशिक्षण दिले जाते. आणीबाणीच्या वेळी नेमके काय करावे, दररोजचे कामकाज कसे पार पाडावे याबद्दलची माहिती प्रशिक्षणात दिली जाते. ‘सुरक्षा मंडळ’ कायद्यानुसार त्यांना महागाईभत्ता दिला जातो. मात्र एजन्सीतर्फे शस्त्रे, हत्यारे दिली जात नाहीत. - संदीप सुरवसे, एरिया आॅफिसर, आयएसएस एजन्सीबहुतांश सुरक्षारक्षक हे परराज्यातून आलेले असतात. त्यामुळे आमच्याकडे येथील कायमस्वरूपी रहिवास पुरावा नसतो. शासनाच्या निर्णयानुसार, कामगार मंडळाच्या सोयी व लाभ हे येथील रहिवाशांना मिळतात. मात्र आम्ही त्यापासून वंचित राहतो. पोटाची खळगी भरण्यासाठी आम्हाला मोठ्या शहरांकडे यावेच लागते. शासनाकडून सोयी-सुविधा मिळाल्या नाहीत, तरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मग मिळेल ती नोकरी स्वीकारण्याशिवाय पर्याय नसतो. - अशोक कुमार राय, सुरक्षारक्षकसोसायट्या किंवा कार्यालयात सुरक्षारक्षकाची नोकरी असेल तर तेथे स्वच्छतागृहे व पिण्याच्या पाण्याची सोय असते, मात्र एखाद्या बांधकाम सुरू असलेल्या साईट्सवर किंवा एटीएमसारख्या सेंटरवर नेमणूक असेल तर स्वच्छतागृहांची, पिण्याच्या पाण्याची सोय नसते. अशा वेळी परिसरात ही अशी सोय उपलब्ध नसते. दूर असणाऱ्या स्वच्छतागृहात जायचे म्हटले तरी लोक सुरक्षारक्षक जागेवर नसल्याचा आरडाओरडा करतात. अनेकदा आम्हाला पोटाचाही त्रास होतो. - लवकुश चौहान, सुरक्षारक्षक